जिरायत भागाला 2023 पर्यंत निळवंडे कालव्यातून पाणी देणार - आ. काळे

जिरायत भागाला 2023 पर्यंत निळवंडे कालव्यातून पाणी देणार - आ. काळे
आ. आशुतोष काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

मागील तीन पिढ्यांपासून आस लावून बसलेल्या जिरायती भागाला 2023 पर्यंत निळवंडे कालव्यातून पाणी देण्याची ग्वाही जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी दिली आहे. त्यादृष्टीने महाविकास आघाडीचे सर्वच आमदार पाठपुरावा करीत असून 2023 पर्यंत कालवे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

आ.काळे म्हणाले, मागील पाच ते सहा दशकापासून कोपरगाव तालुक्यातील जिरायती भागातील शेतकरी निळवंडे धरणाच्या कालव्यातून मिळणार्‍या पाण्याकडे डोळे लावून बसले होते. मात्र निळवंडे कालव्यांची कामे रेंगाळत पडल्यामुळे शेतकर्‍यांच्या चिंता वाढल्या होत्या. मात्र राज्यात 2019 ला महाविकास आघाडीचे सरकार येताच निळवंडे कालव्यांसाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेवून निळवंडे कालव्यांसाठी 470 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे निळवंडेच्या कामाला वेग आला आहे. 2022 पर्यंतच निळवंडेचे मुख्य कालवे पूर्ण करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न होता.

मात्र दोन वर्षापूर्वी आलेल्या करोना महामारीने शासनाच्या आर्थिक अडचणी वाढल्या. त्यामुळे एक वर्ष वाया गेले. परंतु 2023 पर्यंत मुख्य कालव्यांची कामे पूर्ण करायची असा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न असून जलसंपदा मंत्री ना. पाटील यांनी विधानसभेच्या अधिवेशनात आश्वासित केले आहे. त्यादृष्टीने महाविकास आघाडीचे सर्वच आमदार त्याबाबत पाठपुरावा करीत आहे. रस्ते विकासाचा अनुशेष मोठा असतांना करोनाच्या संकटात देखील महाविकास आघाडी सरकार कडून रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. यापेक्षा जास्त निधी कसा मिळविता येईल यासाठी माझा पाठपुरावा सुरु असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com