
खंडाळा |वार्ताहर| Khandala
राहता तालुक्यातील नांदूर बुद्रुक येथे निळवंडे कालव्याचे सुरु असलेल्या कामावरील वाहनातून गुरुवारी पहाटे 300 लिटर डिझेल व डंपरच्या 2 बॅटर्या अज्ञात चोरट्यांनी चोरल्या. नांदूर-लांडेवाडी दरम्यान असणार्या रस्त्यापर्यंत निळवंडे कालव्याचे खोदकाम झालेले आहे. त्याच रस्त्यावर कालव्यावरील पुलाचे काम सुरु आहे.
कामासाठी लागणारी यंत्रसामुग्री व मजूर याच ठिकाणी राहतात. बुधवारी मध्यरात्रीनंतर बंदीस्त शेडमध्ये झोपलेल्या मजूरांच्या खोलींचे दरवाजे अज्ञातांनी तारेने बांधून टाकले. त्यानंतर डंपर क्रमांक एम. एच. 19 झेड 4091 याच्या दोन बॅटर्या, डिझेल तसेच डंपर क्र. एम. एच. 19 झेड 3021, रोलर बी. डब्लू. 212-2 (2 ए ), डंपर क्र. एम. एच. 19 झेड 3020, डंपर क्र. एम. एच. 19 झेड 0770 व पोकलॅन्ड या सर्व वाहनांतून सुमारे तीनशे लिटर डिझेलची चोरी केली. अशी माहीती एम. एस. कंस्टूटेक प्रा. लि. जळगाव या कंपनीचे व्यवस्थापक आर. एस. गुजर यांनी दिली.