निळवंडे कालवा सर्वेक्षणाबाबत शुक्रवारी अकोलेत बैठक
File Photo

निळवंडे कालवा सर्वेक्षणाबाबत शुक्रवारी अकोलेत बैठक

अकोले |प्रतिनिधी| Akole

निळवंडे (Nilwande) उच्चस्तरीय कालव्यांच्या विस्तारासंदर्भात शासकीय सर्वेक्षण (Government Survey) करण्याबाबत निविदा मंजूर झाली असून टेंडर प्रक्रिया (Tender Process) पार पडली आहे. सर्वेक्षणाचे काम आपल्याला आपल्या गावच्या अपेक्षेनुसार करून घ्यायचे आहे. सर्वेक्षण (Survey) चुकीचे झाले तर नंतर ओरडून फायदा होणार नाही. याकरीता शुक्रवार दिनांक 17 जून रोजी दुपारी 1.30 वाजता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कार्यालय, वसंत मार्केट मागे, अकोले (Akole) येथे मुख्य सर्वेअर व जलसंपदाचे अधिकारी यांचेसमवेत याबाबत चर्चा आयोजित करण्यात आली आहे.

File Photo
देशातील पहिली खासगी प्रवासी ट्रेन उद्या शिर्डीत

लाभक्षेत्रातील सर्व गावांमधील सरपंच, उपसरपंच, मान्यवर नेते व कार्यकर्ते यांनी आपल्या गावातील कालवे विस्ताराच्या बाबतचे नकाशे व माहिती घेऊन या बैठकीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ. अजित नवले (Dr. Ajit Navale) यांनी केले आहे.

File Photo
अगस्ति साखर कारखाना निवडणूक : एकाची उमेदवारी, 44 अर्ज नेले
File Photo
अगस्तिची निवडणूक बिनविरोध होणार की चुरशीची?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com