निळवंडेचे कालवे वेड्या बाभळींनी वेढले

अंत्य कालव्यांच्या कामाचा वेग मंदावला
निळवंडेचे कालवे वेड्या बाभळींनी वेढले

पिंपरी निर्मळ (वार्ताहर)

उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी टापुतील गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे काम झाले, मात्र कालव्यांच्या कामांना वेग नसल्यामुळे पिंपरी निर्मळ शिवारात काम पूर्ण झालेले कालवे वेड्या बाभळींनी वेढले आहेत. विषेश म्हणजे याच भागात आजपर्यंत कालव्यांची तिनदा कामे झाली आहेत.

निळवंडेचे कालवे वेड्या बाभळींनी वेढले
वीजपुरवठा सुरळीत करताना वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

पन्नास वर्षांपूर्वी उत्तर नगर जिल्ह्यातील जिरायती व कायमच दुष्काळी टापुतील १८२ गावातील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी निळवंडे धरणाचा प्रस्ताव करण्यात आला. गेल्या पन्नास वर्षात धरण बांधून झाले त्यात पाणीही साठविले जात आहे. मात्र कालवे नसल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना शेतीला व पिण्यासाठी पाणी मिळाले नसल्याचे वास्तव आहे. त्यातच चालू वर्षी प्रकल्पासाठी बऱ्यापैकी निधी मिळाला होता. त्यातील मोठा भाग भूसंपादनासाठी खर्च झाला आहे.

निळवंडेचे कालवे वेड्या बाभळींनी वेढले
Irrfan Khan Birth Anniversary : आठवणीतला इरफान खान…

कालव्यांची कामे ६० टक्के पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे पूर्ण होवून पाणी मिळण्याची वाट चातकाप्रमाणे लाभधारक शेतकरी पाहत आहेत. मात्र कालव्यांच्या कामांना वेग नसल्यामुळे पिंपरी निर्मळ शिवारात काम पूर्ण झालेले कालवे वेड्या बाभळींनी वेढले आहेत. विशेष म्हणजे याच भागात आजपर्यंत कालव्यांची प्रथम रोजगार हमी योजनेतून दोनदा यांत्रीकीकरणातून अशी तिनदा कामे झाली आहेत. मात्र कालवे वाहते न झाल्याने या कालव्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे झुडूपे, वेड्या बाभळी उगवल्या आहेत. त्यासाठी पाटबंधारे विभागाला पुन्हा चौथ्यांदा येथे निधी खर्च करून काम करावे लागाणार असल्याचे चित्र आहे.

निळवंडेचे कालवे वेड्या बाभळींनी वेढले
Katrina and Vicky : विकी-कतरिनाच्या हळदीचे फोटो पाहिलेत का?

अंत्य कालव्यांच्या कामाचा वेग मंदावला

पिंपरी निर्मळ शिवारातून सुरू होणाऱ्या निळवंडेच्या अंत्य कालव्यांचे काम सध्या सुरू आहे. मात्र या कामाला फारसा वेग नसल्यामुळे गेल्या वर्षभरापासून सुरू झालेल्या कामाने ५० टक्के काम पूर्ण करण्याचा टप्पाही गाठला नाही. पाटबंधारे विभागाकडून चालू वर्षी जून २०२२ मध्ये मुख्य कालव्याची चाचणी घेण्याचे धोरण असताना रेंगाळलेली कामे व पूर्ण झालेल्या कालव्यांमध्ये उगवलेल्या वेड्या बाभळींमुळे नवीन समस्या निर्माण होणार आहे.

निळवंडेचे कालवे वेड्या बाभळींनी वेढले
राहात्यात ५ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
निळवंडेचे कालवे वेड्या बाभळींनी वेढले
मुंबईत राहूनही मराठी येत नाही?; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला झापलं

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com