‘निळवंडे’च्या कालवा व पोटचार्‍यांचे काम खुल्या पद्धतीने करण्यास ‘जलसंपदा’ची तत्वत: संमती

‘निळवंडे’च्या कालवा व पोटचार्‍यांचे काम खुल्या पद्धतीने करण्यास ‘जलसंपदा’ची तत्वत: संमती

उंबरे |वार्ताहर| Umbare

निळवंडे धरणाच्या कालवा (Nilwande Dam Canals) व पोटचार्‍यांचे काम बंदिस्त करण्याऐवजी खुल्या पध्दतीने करण्यास जलसंपदा विभागाच्या (Department of Water Resources) अधिकार्‍यांनी तत्वतः संमती दर्शवली असून याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत बैठक होऊन शेतकर्‍यांच्या हिताचा निर्णय होईल, अशी माहिती माजी आ.शिवाजीराव कर्डिले (Former MLA Shivajirao Kardile) यांनी दिली आहे.

‘निळवंडे’च्या कालवा व पोटचार्‍यांचे काम खुल्या पद्धतीने करण्यास ‘जलसंपदा’ची तत्वत: संमती
पतीने पत्नीकडे नांदायला जावे

निळवंडे धरण कालवा (Nilwande Dam Canals) व पोटचार्‍याचे काम खुल्या पध्दतीने व्हावे अशी राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) शेतकर्‍यांची मागणी आहे. याबाबत निळवंडे धरण (Nilwande Dam) कालव्यांच्या कामांचा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील नेत्यांच्या उपस्थितीत मुंबई (Mumbai) येथे अधिकार्‍यांकडून आढावा घेण्यात आला. यातील 1 ते 84 किमी अंतर हे खुल्या पध्दतीनेच झालेले आहे. त्यामुळे उर्वरित 95 पर्यंतचे काम व पोटचार्‍या खुल्या पध्दतीने होण्यासाठी शेतकर्‍यांना माजी आ. शिवाजीराव कर्डिले (Former MLA Shivajirao Kardile) यांना निवेदन देऊन मागणी केली होती.

‘निळवंडे’च्या कालवा व पोटचार्‍यांचे काम खुल्या पद्धतीने करण्यास ‘जलसंपदा’ची तत्वत: संमती
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे शेतकर्‍यांच्या बांधावर जावून पंचनामे करा

याबाबत मुंबई येथे दि.13 रोजी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस माजी आ. कर्डिले, खा. डॉ. सुजय विखे पाटील (MP Dr. Sujay Vikhe Patil), खा. सदाशिव लोखंडे (MP Sadashiv Lokhande), आ. प्रा. राम शिंदे (MLA Ram Shinde), माजी आ. वैभव पिचड, विवेक कोल्हे, जलसंपदा विभागाचे सचिव रजपूत, औरंगाबाद विभागाचे कार्यकारी संचालक बेलसरे, पुणे विभागाचे मुख्य अभियंता धुमाळ, अहमदनगरचे अधिक्षक अभियंता नाईक, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale) आदी उपस्थित होते. यावेळी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी निळवंडे धरण कालव्याच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच शेतकर्‍यांच्या मागणी प्रमाणे काम करण्याच्या सुचना अधिकार्‍यांना दिल्या.

‘निळवंडे’च्या कालवा व पोटचार्‍यांचे काम खुल्या पद्धतीने करण्यास ‘जलसंपदा’ची तत्वत: संमती
राम शिंदे-आ. पवारांच्या राजीनाम्यांचे फुसके बार
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com