मराठवाडा सीमेवर नेवासा पोलिसांची रात्री नाकाबंदी

मराठवाडा सीमेवर नेवासा पोलिसांची रात्री नाकाबंदी

देवगडफाटा (वार्ताहर) - नेवासा तालुक्यातील नगर- औरंगाबाद राज्य महामार्गावर रात्रीची वाहतूक वाढल्याने नेवाशाचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी रात्रीची नाकाबंदी अधिक मजबूत केली असून यासाठी 15 पोलीस कर्मचारी तैनात ठेवले आहेत.

रात्रीच्यावेळी पोलीस निरीक्षक विजय करे व त्यांचे सहकारी उपनिरीक्षक श्री. खेडकर, उपनिरीक्षक श्री. भाटीवाल मराठवाड्याच्या सीमेवर चोख बंदोबस्त ठेवत आहेत.

पोलिसांनी औरंगाबाद जिल्ह्यातील नियम तोडून बाहेरून येणार्‍यांना ‘नो एन्ट्री’ केली आहे. विशेष म्हणजे, जवळच्या खेड्यापाड्यांतूनही कोणी येणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. पास असणार्‍यांनाच नगर जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे. त्या पासचीही पाहणी केली जाते. त्या वाहनांची पाहणी करून मगच त्या वाहनाला अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश दिला जातो. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील पोलीस प्रशासनचा कायगाव येथे चेक पॉइंट आहे ते नगर जिल्ह्यातील वाहनधारकांना ई पास असल्याशिवाय प्रवेश देत नाही.

नेवासा पोलीस निरीक्षक लक्ष ठेऊन

‘करोना’च्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याच्या सीमा ‘सील’ केल्या आहेत. नेवासा पोलीस निरीक्षक विजय करे, त्यांचे सहकारी व आरोग्य, महसूल अधिकारी आपले कर्तव्य बजावत आहेत.

नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतच टोका प्रवरासंगम याठिकाणी औरंगाबाद-पुणे महामार्गावर दोन्ही सीमा येतात. या ठिकाणी रात्रंदिवस पहारा देताना पोलिसांची अक्षरशः दमछाक होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com