निघोजमध्ये टँकर मोटारसायकल अपघातात दोघांचा मृत्यू

एक जखमी
निघोजमध्ये टँकर मोटारसायकल अपघातात दोघांचा मृत्यू

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर तालुक्यातील निघोज परिसरातील कन्हैय्या कंपनी जवळ मोटरसायकल व टँकर अपघातात दोघांचा मृत्यू झाला असुन एक किरकोळ जखमी झाला आहे. मंगळवारी (दि. 8) सायंकाळी पाचच्या दरम्यान ही दुर्घटना झाली. यामध्ये मोटरसायकल चालक (एम एच 16 सिटी 9961) निलेश गणेश रासकर (वय वर्षे 30) व कांताराम भिका भामरे (वय 53) हे जबर जखमी होऊन उपचारापूर्वी मृत झाले. तसेच मोटारसायकलवर मध्यभागी बसलेला संपत नामदेव भांमरे (वय 30) किरकोळ जखमी झाले. याबबत संपत भामरे यांनी निघोज पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.

यात म्हटले आहे की, आम्ही तिघे निघोज येथून शिरुरला जाण्यासाठी निघालो असता कन्हैया कंपनीकडे येणारा टँकरला क्रमांक (एमएच 02, 2020) मोटारसायकलची मागून धडक बसली. टँकर चालकाने वळतांना ईशारा न दिल्याने हा अपघात झाला. नीलेश रासकर व कांताराम भांबरे यांना शिरुर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये नेत असतांना त्यांचा मृत्यू झाला. सदर अपघात प्रकरणी पोलीसांनी टँकर चालक अक्षय लंके यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला. याबाबत हेडकॉन्स्टेबल पी. एच. डहाळे अधिक तपास करीत असून पोलिस उपअधिक्षक कातकाडे व पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी अपघात स्थळी भेट देऊन अधिक माहिती घेतली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com