एन.एच.752 जी चे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण - ना. गडकरींची घोषणा

आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांना यश
एन.एच.752 जी चे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण - ना. गडकरींची घोषणा

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातून जात असलेला सावळीविहीर (Savalivihir) ते सेंधवा (Sendhva) या मार्गाला एन.एच.752 जी (NH 752 G) हा क्रमांक देण्यात आलेला असून या मार्गाचे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण झाले नसल्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद झालेली नव्हती. त्यासाठी या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे तातडीने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण करावे याबाबत आ. आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नामदार नितीन गडकरी (Union Minister for Road Transport and Transport Nitin Gadkari) यांनी एन.एच.752 जी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्याचे जाहीर केले.

सिन्नर (Sinnar), शिर्डी (Shirdi), अहमदनगर (Ahmednagar), दौंड (Daund), बारामती (Baramati), पैठण (Paithan) ते कर्नाटक (Karnatak) राज्यातील शिकोडी पर्यंत एन.एच.160 (N.H. 160) मंजूर करण्यात आला असून राहाता तालुक्यातील सावळीविहीर फाटा ते सेंधवा पर्यंत या रस्त्यासाठी एन.एच.752 जी असा क्रमांक देण्यात आलेला आहे. एन.एच.160 साठी निधीची तरतूद करण्यात आलेली असून या रस्त्याच्या कामाचे टेंडर देखील देण्यात आलेले आहे. मात्र एन.एच.752 चे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण झालेला नसल्यामुळे या मार्गासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नाही.

त्यासाठी आ. आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी हा राष्ट्रीय महामार्ग एन.एच.ए. आय.कडे हस्तांतरीत करण्यासाठी आपण जातीने लक्ष घालावे असे साकडे राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Nationalist Congress Party President Sharad Pawar) यांना घातले होते व त्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नामदार नितीन गडकरी (Union Minister for Road Transport and Transport Nitin Gadkari) यांची देखील दिल्ली येथे भेट घेवून त्यांना हा महामार्ग एन.एच.ए. आय. (N.H.A.I) कडे हस्तांतरीत करण्यासाठी विनंती केली होती. या पाठपुराव्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोपरगाव-सावळीविहीर महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यासाठीचे ना हरकत प्रमाणपत्र देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला मिळवून देण्यासाठी आ. आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी पाठपुरावा केलेला आहे.

या पाठपुराव्याला आज अपेक्षित यश मिळाले आहे. ना. गडकरी यांनी एन.एच.752 जी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्याचे जाहीर केल्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने मोठा फायदा होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com