पुढील महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षा

पुढील महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षा

संगमनेर |वार्ताहर| Sangmner

राज्यातील इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांच्या मागील शैक्षणिक वर्षात होऊ न शकलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा जुलै महिन्यात घेण्याचे नियोजन परीक्षा परिषदेच्यावतीने करण्यात येत आहे.

करोनामुळे प्राथमिक, माध्यमिक शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत. त्यातच यावर्षी पहिली ते बारावीचे सर्व विद्यार्थी पुढील वर्गात विविध निकषाच्या आधारे घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरवर्षी इयत्ता पाचवी व आठवीसाठी घेण्यात येणार्‍या प्रस्तावित शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणार होती. मात्र करोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. एप्रिल महिन्यात ही परीक्षा होऊ शकली नाहीत. आता मात्र मागील शैक्षणिक वर्षात होऊ न शकलेली शिष्यवृत्ती परीक्षा नव्या शैक्षणिक वर्षात म्हणजे जुलैमध्ये घेण्याचे संकेत परीक्षा परिषदेच्यावतीने देण्यात आले आहेत.

आता पावसाळा सुरू झाल्यामुळे प्रशासकीय पातळीवरती पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे गोपनीय साहित्य सुरक्षित ठिकाणाची निश्चिती करणेबाबतचे परीक्षा परिषदेच्यावतीने आदेश देण्यात आले आहेत.

परीक्षा केंद्रसंचालक, उपकेंद्रसंचालक, पर्यवेक्षक व शिपाई नियुक्तीबाबत तसेच परीक्षेचे गोपनीय साहित्य ठेवण्याचे सुरक्षित ठिकाण निश्चित करणेबाबतच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com