
नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa
नेवासा येथील मार्केट यार्ड परिसरात हातात तलवार बाळगलेल्या तरुणाकडून तलवार जप्त करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल गणेश गलधर यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 29 जानेवारी रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास नेवासा खुर्द येथील मार्केटयार्ड परिसरात विकी नंदू चौधरी (वय 28) हा त्याच्या राहते घरात विनापरवाना बेकायदा तलवार बाळगताना मिळून आला.
त्याच्याकडून 450 रुपये किमतीची लाकडी मूठ असलेली अडीच फुट लांबीची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. त्याच्यावर आर्म अॅक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.