वीजपंप काढताना विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू; नातेवाईकांचा ठिय्या

विहिर मालकांवर गुन्हा दाखल
वीजपंप काढताना विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू; नातेवाईकांचा ठिय्या

सोनई l वार्ताहर

घोडेगाव-चांदा रस्त्यावर असलेल्या शेतीतील इलेक्ट्रॉनिक मोटार काढताना एका मजूरचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर सोनई पोलिस ठाण्याच्या समोर नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या दोनशे ग्रामस्थांनी ठिय्या अंदोलन केले. यानंतर पोलिसांनी संबंधित विहिर मालकांवर गुन्हा दाखल केला.

वीजपंप काढताना विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू; नातेवाईकांचा ठिय्या
श्रीरामपूरमध्ये हरिण आढळले मृतावस्थेत; बिबट्याने केली शिकार?

घोडेगाव-जुना चांदा रस्त्याच्या शिवारात घोडेगाव येथील अशोक नहार यांचे शेत आहे. विहिरीतील इलेक्ट्रॉनिक मोटार काढण्यासाठी शिवाजी एकनाथ सावंत (वय-२६)यास आणण्यात आले. तो हे काम करण्यासाठी विहिरीत उतरला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मालकाने त्याची कुठलीही खबरदारी घेतली नव्हती. असे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.

सोनई पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता.विहिर मालकावर गुन्हा दाखल केला तरच मृतदेह ताब्यात घेवू असे कुटुंबातील सदस्यांनी सांगितले. सकाळी नाथपंथी समाज संघटनेचे पदाधिकारी यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या अंदोलन केले. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com