नेवासा येथे नव्याने जलसंधारण उपविभागाची निर्मिती

तालुक्यातील कामे गतीने पूर्ण होणार - ना.गडाख
नेवासा येथे नव्याने जलसंधारण उपविभागाची निर्मिती

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

मृद व जलसंधारण विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाची फेररचना करण्यात आली आहे. कामात सुसूत्रता राखण्यासाठी आणि विभागांतर्गंत सर्व तालुक्यांतील कामे अधिक गतीने पूर्ण होण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा या नवीन उपविभागाची नव्याने निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.

नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नेवासा या उपविभागाअंतर्गत नेवासा, शेवगाव आणि पाथर्डी या तीन तालुक्यांचे कार्यक्षेत्र येणार आहे. श्रीगोंदा तालुक्यासाठी स्वतंत्र नगर व पारनेर, श्रीरामपूर- राहता-कोपरगाव- राहुरी, संगमनेर व आकोले, जामखेड व कर्जत आणि आता नव्याने फेररचना करण्यात आलेला नेवासा हे ६ उपविभाग अहमदनगरचे जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात येतील.

जलसंधारण विभागाच्या राज्ययंत्रणेची १७७ उपविभागीय कार्यालये तर जिल्हा परिषदेची उपविभागीय १८९ उपविभाग मंजूर आहेत. आता फेररचनेअंतर्गत जिल्हा परिषदेसाठी २ तालुक्यांकरिता १ उपविभाग याप्रमाणे २१ उपविभाग मंजूर करण्यास राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वीच मान्यता दिलेली आहे.

Related Stories

No stories found.