करोना
करोना
सार्वमत

नेवासा तालुक्यातील ‘या’ गावात करोना उद्रेकाची भीती

गावात 24 संक्रमित; तरीही संपर्कातील व्यक्तींच्या रॅपिड टेस्टला दिरंगाई

Arvind Arkhade

सलाबतपूर|वार्ताहर|Salabtpur

नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे करोना बाधिताच्या संपर्कातील नागरिकांची रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट करण्यास दिरंगाई होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या कोविड 19 या आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. सलाबतपूर गावात अचानक करोनाने शिरकाव केला असून 24 संक्रमित सापडले आहेत. या बाधितांच्या संपर्कातील अनेकांची रॅपिड टेस्ट होणे गरजेचे आहे. मात्र गेल्या तीन दिवसापासून प्रशासन या जीवघेण्या आजारासारख्खा गंभीर विषयाकड दुर्लक्ष करत असल्याने जनतेमध्ये आश्यर्य व्यक्त होत आहे.

प्रशासनाने रॅपिड स्टेस्ट मध्ये 24 करोनाबाधित आढळल्यानंतर संपर्कातील व्यक्तिंचे विलगीकरण करणे गरजेचे होते. मात्र तसे केले गेले नाही. सध्या बाधिताच्या सपर्कातील व्यक्ती राजरोसपणे बाहेर फिरत आहे . यात काही बाधित असतील तर गावात करोना मोठा उद्रेक होण्याची भिती वाढली असून जर करोना बाधितांची संख्या वाढली तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com