नेवासा : अनधिकृत भाजीपाला लिलाव बंद करण्याची मागणी
सार्वमत

नेवासा : अनधिकृत भाजीपाला लिलाव बंद करण्याची मागणी

sukhdev fulari

नेवासा|तालुका प्रतिनिधी|Newasa

नेवासा खुर्द येथील मध्यमेश्वर वस्ती लगत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटसमोर भरणार भाजीपाला अनधिकृत लिलाव बाजार बंद करावा अशी मागणी मध्यमेश्वर वस्तीतील नागरिकांनी केली आहे.

निवासी नायब तहसीलदार एस.के.परदेशी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट समोर असलेल्या आवारात गावातील स्थानिक व्यापारी पहाटे 4 ते सकाळी 8 वाजेपर्यंत अनधिकृतपणे नेवासा तालुक्यासह गंगापूर ,औरंगाबाद येथील व्यापारी एकत्रित येऊन कुठल्याही प्रकारची सोशल डिस्टनसिंग सह करोनासाठी लागू असलेले नियम न पाळता हजारोच्या संख्येने या ठिकाणी एकत्र येऊन भाजीपाल्यासह इतर अत्यावश्यक वस्तूंचा जाहीर लिलाव करण्यासाठी एकत्र येतात.

त्यामुळे करोना सारख्या आजाराचा संसर्ग होऊन मध्यमेश्वरनगर वसाहत कोरोनामुळे बाधित होण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळी शहरासह परिसरातील नागरिक मॉर्निंग वॉकसाठी या रस्त्याने जातात. त्यावेळी तेही या ठिकाणी खरेदी करतात. कदाचित सदरच्या अथवा इतर जिल्ह्यातून येणारे व्यापाऱ्यांमुळे जर एखादी व्यक्ती कोरोना बाधित झाली तर शहराला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे सदर लिलाव बंद करून तो इतरत्र खुल्या जागेत हलविण्यात यावा अन्यथा मध्यमेश्वर वसाहतीतील सर्व नागरिक उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे . निवेदनावर दत्तात्रय मुळे ज्ञानेश्वर टेकाळे, बाबासाहेब दगडे, भारत वालतुरे,चरण परदेशी, गणेश गाढवे, नितीन बोरुडे, सुरेश परदेशी, राम शिंदे यांच्या सह्या आहेत.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com