नेवासा मार्केटयार्ड चौकात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नेवासा मार्केटयार्ड चौकात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा येथील मार्केट यार्ड चौकात ट्रकने दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार झाल्याची घटना घडली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत बरकरार शेरीफ शेख (वय 42) रा. नेवासा खुर्द यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, माझा चुलतभाऊ अब्बास अब्दुलहमीद शेख (वय 50) यास मंगळवार दि. 23 मे रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास तो मोटारसायकलवरून येत असताना मार्केट यार्ड चौकात मालट्रकने (एमएच 16 बीडी 1866) जोराची धडक दिली. त्याने रोडच्या राँगसाईटने चालवून ओव्हरटेक करत असताना मोटारसायकलला धडक दिली.

त्यामुळे भाऊ अब्बास हा खली पडून जखमी झाला. त्यास ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी तो मयत झाला असल्याचे सांगितले. या फिर्यादीवरून ट्रकचालक सुधाकर वसंत चव्हाण (वय 35) रा. सरस्वती कॉलनी श्रीरामपूर याच्यावर अपघात करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com