नेवाशात 88 आदिवासींना साडेतीन लाखांचे खावटी अनुदान वाटप

नेवाशात 88 आदिवासींना साडेतीन लाखांचे खावटी अनुदान वाटप

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

आदिवासी बांधवांसाठी खावटी योजनेच्या अंतर्गत दोन हजार रु. बँक खात्यात अनुदान व दोन हजार रुपयांचे किराणा किट वाटप पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीताताई गडाख यांच्या हस्ते सभापती रावसाहेब कांगुणे यांचे उपस्थितीत करण्यात आले.

मंत्री शंकरराव गडाख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे 2014 साली बंद झालेली खावटी अनुदान योजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने राज्यात पुन्हा सुरू केली.

या योजनेअंतर्गत प्रत्येकी 2 हजार रुपयांचे किराणा किटचे वाटप माजी सभापती सुनीताताई गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.

मंत्री शंकराव गडाख यांच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील 1759 आदिवासी कुटुंबांना यापूर्वी 70 लाखांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आलेले आहे. मंगळवारी सुनिताताई गडाख यांच्या हस्ते आणखी 88 आदिवासी कुटुंबांना 1 लाख 76 हजार रुपये रोख स्वरूपात खात्यात वर्ग करण्यात आले व 1 लाख 76 हजारचे अन्नधान्य व किराणा किटचे असे एकूण 3 लाख 52 हजार वाटप करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना विविध योजनांचा लाभ तालुक्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळवून दिला असून यापुढेही शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन सौ सुनीताताई गडाख यांनी केले.

यावेळी सतीश पिंपळे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, पंचायत समिती सदस्य विक्रम चौधरी, नगरसेवक संदीप बेहळे, जितेंद्र कुर्‍हे, रणजीत सोनवणे, दिनेश व्यवहारे, अर्चना कुर्‍हे, उज्वला भोईटे, समाज कल्याण विभागाचे दत्तात्रय लष्करे, स्वरूपचंद गायकवाड व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.