नेवासा तालुक्यात वृक्षसंवर्धन मोहिमेस मोठा प्रतिसाद

114 पैकी 82 ग्रामपंचायतीत कुर्‍हाडबंदी ठराव संमत
नेवासा तालुक्यात वृक्षसंवर्धन मोहिमेस मोठा प्रतिसाद

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील प्रत्येक गावात वृक्षसंवर्धन होवून पर्यावरण समृद्ध व्हावे यासाठी वृक्षसंवर्धन समिती राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभला असून नेवासा तालुक्यातील 114 पैकी 82 ग्रामपंचायतींनी आतापर्यंत कुर्‍हाडबंदीचे ठराव केले असल्याची माहिती वृक्ष संवर्धन समितीचे अविनाश ऊर्फ बाबा सोनवणे यांनी दिली.

याबाबत माहिती देताना श्री. सोनवणे म्हणाले, 2011 पासून सुरु झालेल्या पर्यावरण चळवळीला आता मोठ्या जनआंदोलनाचे स्वरुप आले आहे. आतापर्यंत नगर जिल्ह्यात एक हजाराहून अधिक ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव संमत करुन पाठिंबा दिला आहे.

छोट्या ग्रामीण संस्था, संघटना व पर्यावरणवादी कार्यकर्त एकत्र आले. 1000 ग्रामपंचायतींनी वृक्ष संवर्धन कुर्‍हाड बंदीचें ठराव संमत करुन वृक्ष संवर्धनाचा गावागावात संकल्प केला आहे. सर्व गावांतील ग्रामस्थांबरोबरच ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी यांनीही या चळवळीसाठी तळमळीने मोलाचे योगदान दिले असल्याचे ते म्हणाले.

श्रीरामपूर तालुक्यातील सर्व 52 ग्रामपंचायतींचे ठराव झाले. त्यापाठोपाठ नेवासा, कोपरगाव, जामखेडसह उर्वरीत 9तालुक्यातही मोठा प्रतिसाद लाभत आहे. ज्या गावच्या ग्रामसभा अजून राहिलेल्या आहेत त्या ग्रामसभा जेव्हा होतील तेव्हा त्यामध्येही कुर्‍हाडबंदी वृक्ष संवर्धन ठराव संमत करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्या गावात ग्रामसभेत ठराव संमत झाले व देण्याचे राहिले आहे त्यांनी पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागात ठराव जमा करावेत असे आवाहन पर्यावरणवादी कार्यकर्त्यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com