नेवासाफाटा येथे तिरट जुगार खेळताना 8 जण पकडले

नेवासाफाटा येथे तिरट जुगार खेळताना 8 जण पकडले

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील नेवासा फाटा येथे तिरट नावाचा जुगार खेळताना नेवासा पोलिसांनी आठ जणांना अटक करून त्यांचेकडील रोकड-मोबाईलसह 1लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कॉन्स्टेबल गणेश लक्ष्मण इथापे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, 29 मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास नेवासाफाटा येथे छापा टाकला असता काही इसम हे गोल रिंगण करून पत्ते खेळताना मिळून आले.

त्यांची नावे राहुल जनार्धन लाड (वय 28) रा. नेवासा फाटा, रशीद मुस्तफा शेख (वय 30), गणेश लक्ष्मण गायकवाड (वय 25), दत्तात्रय गोरख साळवे (वय 24), आकाश अनिल गायकवाड (वय 27), अदिनाथ शेटीबा धनवटे (वय 25), इलेश संजय साळवे (वय 22), संदीप सुर्यभान धनगर (वय 27 ) सर्व रा. नेवासा फाटा असे असल्याचे सांगितले.

तेव्हा त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एकूण 1 लाख 67 हजार 300 रुपये रक्कमेचा मुद्देमाल त्यात रोख रक्कम व सात विविध कंपनीचे मोबाईल हॅन्डसेट तसेच तीन दुचाकी मोटार सायकल असा मुद्देमाल मिळून आला आहे.

तसेच तीरट नावाचे जुगाराचे साहित्य साधने व पत्ते असे वरील आरोपींच्या अंगझडतीमध्ये तसेच डावाच्या मध्यभागी मिळून आल्याने ते पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. भाटेवाल यांनी दोन पंचांसमक्ष जप्त केले. कॉन्स्टेबल गणेश लक्ष्मण इथापे यांच्या फिर्यादीवरून मुंबई जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे व पुढील तपास पोलीस नाईक श्री. तमनर करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com