नेवासा तालुक्यातील प्रश्नांचे ओझे हलके करण्यासाठीच मंत्रिपद स्विकारले - ना. गडाख

नेवासा तालुक्यातील प्रश्नांचे ओझे हलके करण्यासाठीच मंत्रिपद स्विकारले - ना. गडाख

बालाजीदेडगाव |वार्ताहर| Balajidedgav

तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी अपक्ष निवडणूक (elections) लढवण्याचे धाडस केले. तसेच तालुक्यातील प्रत्येक गावाचा विकास करता यावा, तालुक्यातील प्रश्नांचे ओझे हलके करता यावे यासाठी मंत्रिपदाचा स्वीकार केला. या मंत्रिपदाचा वापर केवळ तुमच्या सर्वांच्या विकासासाठी करणार असल्याचे प्रतिपादन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Water Conservation Minister Shankarrao Gadakh) यांनी केले. नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) बालाजी देडगाव येथे घोंगडी बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वरचे संचालक बाजीराव मुंगसे होते.

यावेळी प्रास्ताविकात चंद्रकांत मुंगसे यांनी जमीन पोटखराबा, विजेचा प्रश्न, पाणंद रस्ते आदी समस्या मांडल्या. लक्ष्मण बनसोडे, माजी आमदार पांडुरंग अभंग, दादा पाटील घोडके यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी मार्केट कमिटीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, दत्ता मुंगसे,कारभारी चेडे, कडूभाऊ तांबे, महादेव मुंगसे, रामेश्वर गोयकर, उपसरपंच लक्ष्मण गोयकर, बाबासाहेब मुंगसे, संतोष म्हस्के, बालाजी देवस्थानचे सचिव रामानंद मुंगसे, पत्रकार बन्सीभाऊ एडके, नवनाथ मुंगसे, सुभाष मुंगसे, चंद्रभान कदम, उद्धव मुंगसे, दादासाहेब एडके, संतोष तांबे, श्रीकांत हिवाळे, ग्रामपंचायत सदस्य महादेव पुंड, भारत कोकरे आदी उपस्थित होते. यावेळी रमेश मुंगसे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी विविध संघटनांच्यावतीने आमदार शंकरराव गडाख यांचा सत्कार करण्यात आला. इन्नुस पठाण यांनी सुत्रसंचालन केले. ग्रामपंचायत सदस्य अशोक मुंगसे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.