
चांदा |वार्ताहर| Chanda
नेवासा तालुक्यातील (Newasa) चांदा, बर्हाणपूर, सोनई, खेडल परमानंद, शिरेगाव, पानेगाव, घोडेगाव, माका, भेंडा, बालाजी देडगाव परिसरात अचानक आलेल्या पावसाने (Rain) गव्हासह रब्बी पिकांचे नुकसान (Crops Loss) झाले असून गव्हाचे पिक आडवे झाले आहे.
सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाने (Stormy Rain) अचानक हजेरी लावली. सुमारे तासभर चाललेल्या जोरदार वादळी पावसाने रब्बी पिकांचे नुकसान (Loss) झाले आहे.
तर निसून स्थिर झालेला गहू सोसाट्याच्या वार्याने आडवा झाला आहे. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या मुसळधार पावसाने शेतातून पाणी वाहीले. पाऊस सुरू असल्याने बळीराजाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.