नेवासा तालुक्यात 5 सरपंच व 29 सदस्य बिनविरोध

एक ग्रामपंचायत पूर्णपणे बिनविरोध || 12 ग्रामपंचायतींच्या 96 सदस्यांसह 8 सरपंचांसाठी होणार निवडणूक
नेवासा तालुक्यात 5 सरपंच व 29 सदस्य बिनविरोध

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींच्या अर्ज माघारीच्या दिवशी 5 ग्रामपंचायतींचे सरपंचांसह 29 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध झाले आहेत. चिंचबन ही एकमेकव ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांसह पूर्णपणे बिनविरोध झाली आहे. आता 18 डिसेंबरला 8 सरपंचांसह 12 ग्रामपंचायतींच्या 96 सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे.

चिंचबन

नेवासा तालुक्यातील चिंचबन ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली. सरपंचपदी मिनाक्षी गोरक्षनाथ काकडे विजयी झाल्या तर सदस्यपदी सुनीता भारत चव्हाण, ताराबाई भाऊसाहेब मापारी, शारदा सोपान चव्हाण, सविता संजय शिंदे, कमल पोपट बर्डे, कमल रमेश जाधव, दत्तात्रय बहिरू रजपूत हे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले.

सुरेशनगर

सुरेशनगरच्या सरपंचपदी शैला कल्याण उभेदळ बिनविरोध निवडून आल्या. प्रभाग 1 मधून संगीता आण्णा क्षीरसागर, सुवर्णा सतीश क्षीरसागर व विनोद बाजीराव निकाळजे हे बिनविरोध निवडून आले. प्रभाग 2 मधून विकास पांडुरंग उभेदळ व मैनाबाई नाथा बाबर बिनविरोध विजयी झाल्या येथे दोन सदस्यांसाठी निवडणूक होईल.

खुपटी

खुपटीच्या सरपंचपदी दत्तात्रय सुर्यभान वरुडे बिनविरोध निवडून आले. सदस्यपदी प्रभाग 1 मधून शितल बाबासाहेब वरुडे, अमोल मधूकर गव्हाणे व सकट दिलीप रावसाहेब विजयी झाले. प्रभाग 2 मधून कांताबाई अर्जुन कार्ले व रावसाहेब बाबू पवार विजयी झाले. पभाग 3 मधून मंगल किशोर कुर्‍हे, दिगंबर रखमाजी ससे व रोनिका नरेंद्र नेव्हल असे या ग्रामपंचायतीत 8 सदस्य बिनविरोध निडून आले.

गोधेगाव

गोधेगावच्या सरपंचांची निवडणूक होणार आहे. या ग्रामपंचायतीचे 6 सदस्य बिनविरोध निवडून आले. त्यामध्ये प्रभाग 1 मधून जानकाबाई सारंगधर शेळके व भीमाबाई कडूबाळ मोटे, प्रभाग 2 च्या अनुसूचित जाती जागेवरील ज्ञानेश्वर बाळासाहेब पारखे बिनविरोध निवडून आले. प्रभाग तीन मधील सविता पोपट पठाडे, भगवान भाऊसाहेब काळे व रामेश्वर भाऊसाहेब शेलार हे तिघेही बिनविरोध निवडून आले.

हिंगोणी

हिंगोणीच्या सरपंचपदी रुपाली ज्ञानेश्वर खंडागळे बिनविरोध निवडून आल्या. त्याशिवाय तीन सदस्य बिनविरोध निवडून आले. त्यामध्ये प्रभाग 1 मधील अनुसूचित जाती स्त्री राखीव मधून शोभा बाबासाहेब खंडागळे, प्रभाग 2 मधून सर्वसाधारणमधून प्रकाश तुकाराम झिने तसेच सर्वसाधारण स्त्री मधून नंदा झुंबर झिने बिनविरोध निवडून आल्या.

शिरेगाव

शिरेगावचे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या सरपंचपदी निरंजन द्वारकनाथ तुवर यांचा एकमेव अर्ज राहिल्याने ते बिनविरोध निवडून आले. या ग्रामपंचायतीचे एकही सदस्य बिनविरोध निवडून आले नाहीत.

अशाप्रकारे सुरेशनगर, खुपटी, चिंचबन, शिरेगाव व हिंगोणी या पाच गावचे सरपंच बिनविरोध निवडून आले. सुरेशनगर ग्रामपंचायत पूर्णपणे बिनविरोध झाली. खुपटीचे 8 सदस्य, चिंचबनचे सर्व 7 सदस्य सुरेशनगरचे 5 सदस्य, गोधेगावचे 6 सदस्य व हिंगोणीचे तिघे सदस्य असे एकूण 29 सदस्य बिनविरोध निवडून आले.

13 पैकी 5 ग्रामपंचायतींचे सरपंच व 29 सदस्य बिनविरोध निवडून आले. एक ग्रामपंचायत पूर्णपणे बिनविरोध निवडून आल्याने आता 12 ग्रामपंचायतीत 8 सरपंच व 96 सदस्यांसाठी 18 डिसेंबरला निवडणूक होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com