नेवासा तालुक्यात ‘लम्पी’चा शिरकाव

नेवासा तालुक्यात ‘लम्पी’चा शिरकाव

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात जनावरांच्या लम्पी या विषाणूजन्य त्वचारोगाचा शिरकाव झाला असून या आजारावर प्रतिबंधासाठी पुरेशा प्रमाणात लसींची उपलब्धता करावी अशी मागणी कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी केली आहे. या आजारामुळे बाधित झालेल्या जनावरांच्या नाका-तोंडातून सुरुवातीला पाणी येते. ताप येतो. जनावरांच्या अंगावर गाठी येतात. त्यावर जखमा होतात.

याचा प्रचार माशा गोचीड याद्वारे होतो. त्यामुळे गोठे स्वच्छ ठेवावेत तसेच कडूलिंबाच्या पानाचा संध्याकाळी गोठ्यामध्ये धूर करावा. आजारी जनावरे वेगळी ठेवावीत. या रोगामुळे दुधाचे प्रमाण घटते. गर्भपात होण्याची शक्यता असते. विशेषतः लसीकरण करणे हा त्यावरील हुकमी उपाय आहे. लस उपलब्धता वाढविण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी लसींची मागणी वाढवावी, असे आवाहन कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com