नेवासा तालुक्यातील जनावरांना लाळ्या-खुरकूतच्या लसीकरणास प्रारंभ

1 लाख 36 हजार डोस उपलब्ध; आतापर्यंत साडेएकवीस हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण
नेवासा तालुक्यातील जनावरांना लाळ्या-खुरकूतच्या लसीकरणास प्रारंभ

नेवासा| सुखदेव फुलारी| Newasa

नेवासा तालुक्यासाठी (Newasa Taluka) लाळ्या-खुरकूत लसीचे 1 लाख 36 हजार डोस प्राप्त झाले असून 26 सप्टेंबर अखेर एकूण 21530 जनावरांचे लसीकरण (livestock Vaccination) पूर्ण झाले आहे.

एप्रिल 2021 महिन्यात लाळ्याखुरकुत-घटसर्प रोगाची लागण होऊन नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) 123 जनावरे दगावली (livestock Death) होती. जिल्हा परिषद पशु संवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख (ZP Speaker Sunil Gadakh) यांनी पुढाकार घेत पुण्याहून तातडीने लसीचे 9 हजार डोस मागवून जनावरांचे लसीकरण (livestock Vaccination) सुरू केले होते. तातडीने लसीकरण केल्याने मुळे जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली होती. सध्या जनावरांमध्ये लंपी आजाराची लागण झालेली आढळून आलेले आहे.

त्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाय योजना म्हणून तालुक्यात लाळ्या खुरकूत लसीचे लसीकरण हाती घेण्यात आलेले आहे. नेवासा तालुक्यात एकूण 1 लाख 52 हजार पशुधन असून त्यांचे लाळ्या खुरकूत लसीकरण हाती घेण्यात आले आहे.त्यासाठी लसीचे एकूण 1 लाख 36 हजार डोस प्राप्त झालेले आहेत. दि. 17 सप्टेंबर पासून लसीकरण हाती घेण्यात आले आहे.26 सप्टेंबर अखेर गायवर्ग 19 हजार 293 व म्हैसवर्ग 2237 असे एकूण 21 हजार 530 जनावरांचे लसीकरण (livestock Vaccination) पूर्ण झाले आहे.

तालुक्यातील कुकाणा पशुवैद्यकीय दवाखान्या अंतर्गत लाळ्या खुरकूत लसीचे 18 हजार 500 प्राप्त झाले असून दि.27 सप्टेंबर अखेर गायवर्ग 2945 व म्हैस वर्ग 719 अशा एकूण 3664 जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

कुकाणा केंद्राअंतर्गत गावनिहाय झालेले लसीकरण

जेऊर हैबती (899),देवगाव (1359),भेंडा बुद्रुक (100), भेंडा खुर्द (100), तरवडी (744), सुलतानपूर (120),वडूले (172), चिलेखनवाडी (95), देवसडे (75).

पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांचे मार्गदर्शनाखाली जनावरांना लसीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. कुकाणा पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी 18 हजार 500 डोस प्राप्त झाले असून दि.17 सप्टेंबर पासून लसीकरण सुरु केले आहे. 26 सप्टेंबर अखेर 3664 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मरतूक आणि रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता पशुसंवर्धन विभाग सज्ज झालेले आहे.

- डॉ. अमोल गायकवाड पशुधन विकास अधिकारी, कुकाणा

नेवासा तालुक्याला 1 लाख 36 हजार डोस आले आहेत. पशु संवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख व प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.अरुण हरिश्चंद्रे यांचे मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व जनावरांचे 100 टक्के लसीकरण करण्यात येणार आहे.

- डॉ. दिनेश पंडुरे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी

Related Stories

No stories found.