नेवासा तालुक्यात खरिपासाठी रासायनिक खतांचा मुबलक साठा

दररोज अद्ययावत साठाफलक न लावल्यास कृषी सेवा केंद्रांवर कारवाई || अधिकार्‍यांचा इशारा
नेवासा तालुक्यात खरिपासाठी रासायनिक खतांचा मुबलक साठा

नेवासाफाटा |प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात (Newasa Taluka) खतांचा (Fertilizer) 9 हजार मेट्रिक टन इतका मुबलक साठा (Stock) उपलब्ध असून तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र (Agricultural Service Center) चालकांनी दररोज सकाळी अद्ययावत साठाफलक लावावा. तसे न केल्यास खत नियंत्रण आदेश 1985 मधील खंड 4 नुसार कृषि केंद्रांवर कारवाई (Agricultural Service Center Action) करण्यात येईल असा इशारा तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय डमाळे व कृषि अधिकारी प्रताप कोपनर यांनी दिला आहे.

नेवासा तालुक्यात खरिपासाठी रासायनिक खतांचा मुबलक साठा
संगमनेरात ‘भैय्यू’कडून चक्क वाळू तस्करांना लाखो रुपयांचा गंडा

ऐेनवेळी बियाणाबरोबर खतांचा तुटवडा भासू नये म्हणून जिल्ह्यासह, कृषि विभागाने (Department of Agriculture) तालुक्यातील सर्वच कृषि सेवा केंद्र ऑनलाईन (Agriculture Service Center Online) करून दुकानातील खतांचा शिल्लक साठा (Balanced Stock of Fertilizers) समजणार आहे. चढया भावाने विक्री होऊ म्हणून त्यावर नियंत्रण ठेवता येईल असी माहिती देण्यात आली असून, सध्या कृषि सेवा केंद्रातील साठा पुढील प्रमाणाने आहे.

नेवासा तालुक्यात खरिपासाठी रासायनिक खतांचा मुबलक साठा
उड्डाणपुलाच्या खांबांवर शिवरायांचा जीवनपट

तालुक्यात सध्यस्थितीत 9000 मेट्रीक टन साठा शिल्लक आहे. यामध्ये युरीया 3577 मेट्रीक टन, डीएपी 606 मेट्रीक टन, एमओपी 238 मेट्रीक टन, सिंगल सुपर फॉस्फेट 2146 मेट्रीक टन व संयुक्त खते 2433 मेट्रीक टन साठा उपलब्ध आहे.

ऐन हंगामात खताचा तुटवडा (Fertilizer Shortage) भासू नये याकरीता कृषि विभागाने संरक्षीत साठ्याचे नियोजन केलेले आहे. त्यानुसार तालुक्यात डीएपी 190 मेट्रीक टन व युरीया ( Urea) 455 मेट्रीक टन साठा संरक्षीत करण्यात येणार आहे.

नेवासा तालुक्यात खरिपासाठी रासायनिक खतांचा मुबलक साठा
25 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध

खरीप हंगामाकरीता तालुक्यातील पिकपेर्‍यानुसार 25 हजार 493 मेट्रीक टन खताची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. यामध्ये युरीया खताची 10 हजार 254 मेट्रीक टन, डीएपी खताची 2 हजार 625 मेट्रीक टन, एमआपेी 1 हजार 562 मेट्रीक टन, संयुक्त खते 7 हजार 776 मेट्रीक टन व सिंगल सुपर फॉस्फेट खताची 3 हजार 276 मेट्रीक टन मागणी नोंदविण्यात आलेली आहे.

नेवासा तालुक्यात खरिपासाठी रासायनिक खतांचा मुबलक साठा
माझी वसुंधरा : सर्वोत्तम कामगिरीबद्दल सोनई ग्रामपंचायतीचा गौरव

रशिया युक्रेन युध्दाच्या (Russia-Ukraine War) पार्श्वभूमीमुळे खताची टंचाई (Fertilizer Scarcity) भासू नये याची तयारी रब्बी हंगामापासूनच (Rabbi Season) कृषि विभागाने (Department of Agriculture) केली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील (Rabbi Season) शिल्लक 6519 मेट्रीक टन साठा खरीप हंगामासाठी (Kharif Season) उपलब्ध झालेला आहे. तसेच मागील दोन महिन्यांपासून खताची आवक सुरूच आहे. मागील दोन महिन्यात 8 हजार 475 मेट्रीक टन साठा प्राप्त झालेला आहे. खरीप हंगामाची तयारी शेतकर्‍यांकडून केली जात आहे. त्यामुळे शेतकरी खताची उचल करत आहेत. मागील दोन महिन्यात शेतकर्‍यांनी 5 हजार 994 मेट्रीक टन खताची उचल केलेली आहे.

नेवासा तालुक्यात खरिपासाठी रासायनिक खतांचा मुबलक साठा
महापौरांच्या प्रभागात ‘फेज टू’ची बोंबाबोंब

खताचा रोज सकाळी अद्ययावत साठाफलक लावण्याच्या सुचना सर्व कृषि केंद्रधारकांना देण्यात आलेल्या आहेत. अद्ययावत साठाफलक लावलेला नसल्यास खत नियंत्रण आदेश 1985 मधील खंड 4 नुसार कृषि केंद्रांवर कारवाईचा इशारा तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय डमाळे व कृषि अधिकारी प्रताप कोपनर यांनी दिला आहे. तसेच खताची विक्री व उपलब्ध साठयावर रासायनिक खत नियंत्रण प्रणालीच्या माध्यमातून कृषि विभाग बारीक लक्ष ठेवून आहे. तसेच खत नियंत्रण प्रणालीवरील साठा व गोडावून मधील साठा सारखा करण्याच्या सुचना देखील कृषि केंद्रांना देण्यात आलेल्या आहे. तफावत आढळल्यास कारवाईचा इशारा कृषि विभागाने दिला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com