नेवासा : 12 ग्रामपंचायतींसाठी 80.16 टक्के मतदारांनी बजावला हक्क

भेंडा खुर्द येथे सर्वाधिक 89.63 टक्के तर हिंगोणीत सर्वात कमी 24.15 टक्के मतदान
नेवासा : 12 ग्रामपंचायतींसाठी 80.16 टक्के मतदारांनी बजावला हक्क

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा तालुक्यातील नेवासा तालुक्यातील 8 गावांच्या सरपंचांसह 12 ग्रामपंचायतींचे 95 सदस्य निवडून देण्यासाठी काल रविवारी शांततेत सरासरी 80.16 टक्के मतदान झाले. 9251 महिला व 10592 पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला. भेंडा खुर्द येथे सर्वाधिक 89.63 टक्के तर सर्वात कमी हिंगोणी येथे 24.15 टक्के मतदान झाले.

हंडीनिमगाव येथे एकूण 1175 पैकी 975 मतदारांनी (86.59 टक्के) मतदान केले. सुरेशनगरच्या एका प्रभागातील दोन सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीसाठी 130 पैकी 111 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तेथील मतदानाची टक्केवारी 85.38 टक्के इतकी आहे.खुपटी ग्रामपंचायतीच्या एका प्रभागातील (प्रभाग 2) एका जागेसाठी 726 मतदारांपैकी 526 मतदारांनी मतदान केले. मतदानाचे हे प्रमाण 72.45 टक्के इतके आहे. गोधेगावच्या दोन सदस्यांसह सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी 1090 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाचे प्रमाण 76.98 टक्के इतके आहे.

भेंडा खुर्दच्या 9 सदस्य व सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी 2093 मतदारांपैकी 1876 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाचे हे प्रमाण 89.63 टक्के इतके आहे. माका ग्रामपंचायतीचे 13 सदस्य व सरपंचपदासाठी 3732 पैकी 3013 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाचे प्रमाण 81.24 टक्के इतके आहे.अंमळनेर ग्रामपंचायतीच्या 9 सदस्य व सरपंचपदासाठी 1687 मतदारांपैकी 1464 मतदारांनी मतदान केले. मतदानाचे हे प्रमाण 86.78 टक्के इतके आहे.

शिरेगावच्या 9 सदस्यांसाठी 2172 मतदारांपैकी 1797 मतदारांनी मतदान केले. मतदानाचे हे प्रमाण 82.73 टक्के आहे. वडाळा बहिरोबा ग्रामपंचायतीचे 13 सदस्य व सरपंचपदासाठी 4384 मतदारांपैकी 3376 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचे हे प्रमाण 78.64 टक्के इतके आहे. माळीचिंचोरा ग्रामपंचायतीच्या 13 सदस्य व सरपंचपदासाठी 3926 मतदारांपैकी 3102 मतदारांनी मतदान केले. मतदानाचे प्रमाण 79.04 टक्के इतके आहे.

हिंगोणी ग्रामपंचायतीच्या 4 सदस्यांसाठी प्रभाग 1 व प्रभाग 3 च्या मतदारांनी मतदान केले. दोन्ही प्रभाग मिळून अवघे 156 मतदारांनी मतदान केले. मतदानाचे हे प्रमाण 24.15 टक्के इतके आहे. कांगोणी ग्रामपंचायतीचे 11 सदस्य व सरपंचपदासाठी 2356 मतदारांनी मतदान केले. मतदानाचे प्रमाण 87.94 टक्के आहे. तालुक्यातील 12 गावातील 95 सदस्य व 8 सरपंचांसाठी तालुक्यातील एकूण 9251 महिला व 10592 पुरुष मतदारांनी असे एकूण 19843 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाचे हे प्रमाण 80.16 टक्के आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com