सर्व 13 सरपंचपदांवर आ. शंकरराव गडाख गटाची बाजी

भेंडा खुर्द मध्ये घुले गटातच झाली सरळ लढत || कांगोणीत सरपंच गडाख गटाचा तर बहुमत विरोधी गटाकडे
शंकरराव गडाख
शंकरराव गडाख

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा तालुक्यात सर्व 13 ग्रामपंचायतींवर आमदार शंकरराव गडाख यांच्या गटाने बाजी मारून आपले सरपंच निवडून आणत आपला वरचष्मा सिद्ध केला.

शंकरराव गडाख
पिंपरी निर्मळ बाह्यवळण चौकात दिशादर्शक फलका अभावी साईभक्तांना फटका

माजी आमदार मुरकुटे यांना त्यांच्या सासुरवाडीत मेव्हण्यांच्या कांगोणी गावातच राजकीय अस्त पाहायला मिळाला. कांगोणीत मुरकुटे यांनी त्यांचे मेव्हणे बंडू शिंदे यांच्यामार्फत गावात त्यांचा सरपंच निवडून येण्यासाठी मोठी शक्ती लावली होती. परंतु आमदार आमदार शंकरराव यांच्या गटाने विकास कामांच्या जोरावर गडाख गटाचा सरपंच निवडून आणला.

भेंडा खुर्द येथे घुले गटातच सरळ लढत होऊन तेथे वर्षा वैभव नवले या अत्यंत चुरशीच्या लढतीत सरपंच झाल्या. वडाळा बहिरोबा येथे ललित पांडुरंग मोटे हे सरपंचपदी निवडून आले.

शंकरराव गडाख
लोकायुक्त कायदा रामलिलावरील आंदोलनाचे फलित: हजारे

कांगोणी येथे गडाख गटाच्या रोहिणी सोमनाथ कराळे या जनतेतून सरपंच पदी निवडून आल्या. माका येथे विजया बाबासाहेब पटेकर या सरपंच पदी विराजमान झाल्या. येथेही गडाख गटाचा मोठ्या प्रमाणात विजय झाला.

गोधेगाव येथे देखील बेबी जालिंदर नरोडे यांची सरपंचपदी निवड झाली व सदस्यही गडाख गटाचे विजयी झाले. सुरेशनगरच्या सरपंच शैला कल्याण उभेदळ या बिनविरोध निवडून आल्या.

हंडीनिमगाव येथे अटीतटीच्या लढतीत आमदार शंकराव गडाख यांना मानणार्‍या पूजा भिवाजी आघाव या सरपंच झाल्या.

शंकरराव गडाख
खंडाळ्यात चुकीचा डोस दिल्याने राहुरी, राहात्याच्या 40 मेंढ्या मृत

शिरेगाव येथे आमदार शंकरराव गडाख यांना मानणारे निरंजन गोरक्षनाथ जाधव हे बिनविरोध सरपंच झाले.

खुपटी येथेही गडाखांचे वर्चस्व पहावयास मिळाले. येथेही दत्तात्रय वरुडे सरपंचपदी बिनविरोध निवडून गेले. चिंचबन येथे मीनाक्षी गोरक्षनाथ काकडे या बिनविरोध सरपंचपदी निवडून आल्या. हिंगोणी येथे रूपाली ज्ञानेश्वर खंडागळे याही बिनविरोध सरपंच झाल्या

माळीचिंचोरा येथे गडाख यांना मानणारे राजेंद्र देवराव अहिरे हे अवघ्या नऊ मतांनी सरपंचपदी निवडून आले.

शंकरराव गडाख
आरोग्य खात्याच्या कायाकल्प पुरस्कारांत नगर राज्यात नंबर वन

अमळनेर येथे ज्ञानेश्वर काशिनाथ आयनर हे सरपंचपदी निवडून आले. अशा प्रकारे तालुक्यावर आमदार शंकरराव गडाख यांचाच वरचष्मा असल्याचे सिद्ध झाले.कांगोणी वगळता सर्व ठिकाणी गडाख गटाचे वर्चस्व आहे. तेथे बहुमत शिंदे यांच्याकडे असले तरी सरपंच गडाख गटाचा झाला आ. गडाख यांच्या नेतृत्वावर तालुक्यातील जनतेने मोठा विश्वास दाखवला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com