नेवासा तालुक्यातील 13 गावांमध्ये निवडणूक हालचाली सुरू

125 सदस्यांसह मतदार थेट निवडणार 13 सरपंच || वडाळा, खुपटी व अंमळनेरात सर्वसाधारणमुळे राहणार चुरस
नेवासा तालुक्यातील 13 गावांमध्ये निवडणूक हालचाली सुरू

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात 18 डिसेंबर रोजी होणार्‍या 13 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर असून 13 ग्रामपंचायतींमधून 125 सदस्यांसह 13 सरपंचांच्या थेट जनतेतून निवडी या निवडणुकीतून होणार आहेत. निवडणुकीमुळे या गावांमध्ये राजकीय हालचाली सुरू झाल्या असून उमेदवार निश्चितीसाठी बैठका होत आहेत. 13 गावांतील 125 सदस्यांपैकी 69 जागा महिलांसाठी राखीव आहेत. तर 13 पैकी किमान 7 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदावर महिला निवडून जाणार आहेत.

तालुक्यातील माळीचिंचोरा, माका व वडाळा बहिरोबा या 13 सदस्यांच्या तीन ग्रामपंचायतींमधून एकूण 39 सदस्य, कांगोणी ग्रामपंचायतींसाठी 11 सदस्य निवडले जातील. शिरेगाव, भेंडा खुर्द, अमळनेर, हंडीनिमगाव, खुपटी व गोधेगाव या 6 ग्रामपंचायतींसाठी प्रत्येकी 9 असे 54 सदस्य तर चिंचबन, सुरेशनगर व हिंगोणी या तीन ग्रामपंचायतींतून प्रत्येकी 7 सदस्य असे 21 सदस्य निवडून जातील. 13 सदस्यांच्या 3 ग्रामपंचायती, 11 सदस्यांची एक ग्रामपंचायत, 9 सदस्यांच्या 6 ग्रामपंचायती व 7 सदस्यांच्या तीन ग्रामपंचायती असे एकूण 13 ग्रामपंचायतींमधून 125 सदस्य निवडले जातील. त्याशिवाय थेट जनतेतून 13 सरपंचही निवडले जाणार असल्याने तालुक्याच्या या गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.

माळीचिंचोरा (13 सदस्य)

निवडणूक जाहीर झालेल्या माळीचिंचोरा ग्रामपंचायतीची सध्याची लोकसंख्या 5175 इतकी आहे. या ग्रामपंचायतीत सर्वसाधारणमधून 7 सदस्य निवडले जाणार असून त्यातील 5 जागा महिलांसाठी राखीव आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एक जागा राखीव आहे. अनुसूचित जातीचे 4 सदस्य निवडले जाणार असून पैकी दोन जागा महिलांसाठी आहेत. अनुसूचित जमातीसाठी एक जागा राखीव आहे. अशाप्रकारे 13 सदस्यांपैकी 7 महिला सदस्य असतील.

वडाळा बहिरोबा (13 सदस्य)

4831 इतकी लोकसंख्या असलेल्या वडाळा बहिरोबा ग्रामपंचायतीत सर्वसाधारणसाठी 8 जागा असून त्यापैकी 5 जागा महिलांसाठी आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 2 जागा असून त्यापैकी एक जागा महिलेसाठी राखीव आहे. अनुसूचित जातीसाठी 2 जागा असून त्यापैकी एक जागा त्या वर्गातील महिलेसाठी राखीव आहे. अनुसूचित जमातीसाठी एक जागा राखीव आहे. ग्रामपंचायतीच्या एकूण 13 पैकी 7 जागांवर महिला निवडून जातील.

माका (13 सदस्य)

माक्याची सध्याची लोकसंख्या 4808 इतकी आहे. या ग्रामपंचायतीत सर्वसाधारणसाठी 9 जागा आहेत. त्यातील 4 जागा सर्वसाधारण महिलांसाठी आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी तीन जागा असून त्यातील दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत. ग्रामपंचायतीची एक जागा अनुसूचित जाती महिलेसाठी आहे. महिलांसाठी राखीव जागांची एकूण संख्या 7 आहे.

कांगोणी (11 सदस्य)

कांगोणी गावची लोकसंख्या 3448 इतकी असून या गावातून 11 सदस्य निवडून जाणार आहेत. सर्वसाधारणसाठी 7 जागा आहेत. त्यातील 4 जागा महिलांसाठी आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी दोन जागा असून पैकी एक जागा महिलेसाठी राखीव आहे. अनुसूचित जातीसाठी 2 जागा असून पैकी एक महिलेसाठी राखीव आहे. ग्रामपंचायतीत एकूण महिलांसाठी 6 जागा राखीव आहेत.

भेंडा खुर्द (9 सदस्य)

भेंडा खुर्दची लोकसंख्या 2792 इतकी असून येथील 9 पैकी 6 जागा सर्वसाधारणसाठी आहेत. त्यातील 4 जागा महिलांसाठी आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी दोन जागा असून त्यापैकी एक महिलेसाठी आहे. अनुसूचित जातीसाठी एक जागा राखीव आहे. ग्रामपंचायतीत एकूण 5 जागा महिलांसाठी राखीव आहेत.

खुपटी (9 सदस्य)

खुपटीची लोकसंख्या 2288 इतकी आहे. या ग्रामपंचायतीत सर्वसाधारणसाठी 5 जागा असून त्यातील 4 जागा महिलांसाठी आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्ग व्यक्तीसाठी एक जागा राखीव आहे. अनुसूचित जातीसाठी 2 जागा असून त्यापैकी एक महिलेसाठी आहे. अनुसूचित जमातीसाठी एक जागा राखीव आहे. एकूण महिलांसाठी राखीव जागा 5 आहेत.

अंमळनेर (9 सदस्य)

अंमळनेरची लोकसंख्या 2284 इतकी असून या गावातून निवडून द्यावयाच्या 9 सदस्यांपैकी अनुसूचित जाती महिलेसाठी एक व अनुसूचित जमाती महिलेसाठी एक जागा राखीव आहे. महिलांसाठी एकूण राखीव जागांची संख्या 5 आहे.

शिरेगाव (9 सदस्य)

शिरेगावची लोकसंख्या 2007 इतकी असून येथे अनुसूचित जातीसाठी 2 जागा असून त्यापैकी एक जागा त्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. अनुसूचित जमातीसाठी एक जागा राखीव आहे. एकूण 9 सदस्यांपैकी 5 जागा महिलांसाठी राखीव आहेत.

हंडीनिमगाव (9 सदस्य)

1884 लोकसंख्येच्या हंडीनिमगाव ग्रामपंचायत सदस्यांच्या 9 पैकी 5 जागा सर्वसाधारणसाठी असून त्यातील तीन जागा महिलांसाठी राखीव आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी दोन जागा असून त्यातील एक महिलेसाठी राखीव आहे. अनुसूचित जातीसाठी दोन जागा असून त्यातील एक जागा महिलेसाठी आहे. ग्रामपंचायतीत एकूण 5 महिला निवडून जातील.

गोधेगाव (9 सदस्य)

गोधेगावची लोकसंख्या 1879 इतकी आहे. ग्रामपंचायतीच्या 9 पैकी अनुसूचित जातीसाठी एक जागा तर अनुसूचित जमाती महिलेसाठी एक जागा राखीव आहे. एकूण महिलांसाठी 5 जागा आरक्षित अहेत.

हिंगोणी (7 सदस्य)

हिंगोणीची लोकसंख्या 1115 इतकी असून निवडून द्यावयाच्या 7 सदस्यांपैकी. अनुसूचित जाती महिलेसाठी एक जागा राखीव आहे. महिलांसाठी एकूण 4 जागा राखीव आहेत.

चिंचबन (7 सदस्य)

चिंचबनची लोकसंख्या 872 इतकी आहे.अनुसूचित जमातीसाठी दोन जागा राखीव असून त्यापैकी एक महिलेसाठी आहे. अनुसूचित जाती महिलेसाठी एक जागा राखीव आहे. महिलांसाठी एकूण 4 जागा राखीव आहेत.

सुरेशनगर (7 सदस्य)

658 लोकसंख्येच्या सुरेशनगर ग्रामपंचायतीच्या 7 पैकी 5 जागा सर्वसाधारणसाठी असून त्यापैकी 4 जागा महिलांसाठी आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एक जागा राखीव आहे. तसेच एक जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या ग्रामपंचायतीत महिलांसाठी एकूण 4 जागा राखीव आहेत.

नेवासा तालुक्यात 18 डिसेंबरच्या निवडणुकीतील सरपंच आरक्षण

ग्रामपंचायत सरपंच आरक्षण

1 माळीचिंचोरा अनु. जमाती

2 वडाळा बहिरोबा सर्वसाधारण

3 माका अनुसूचित जाती

4 कांगोणी सर्वसाधारण स्त्री

5 भेंडा खुर्द सर्वसाधारण स्त्री

6 खुपटी सर्वसाधारण

7 अंमळनेर सर्वसाधारण

8 शिरेगाव नामाप्र

9 हंडीनिमगाव नामाप्र स्त्री

10 गोधेगाव अनु. जमाती स्त्री

11 हिंगोणी अनु. जाती स्त्री

12 चिंचबन सर्वसाधारण स्त्री

13 सुरेशनगर नामाप्र स्त्री

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com