नेवाशातील 16 ग्रामपंचायतीच्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत 8 अर्ज ठरले अवैध

नेवाशातील 16 ग्रामपंचायतीच्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत 8 अर्ज ठरले अवैध

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील 16 ग्रामपंचायती व दोन ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 नोव्हेंबरला होत असलेल्या निवडणुकीसाठी दाखल अर्जांची छाननी काल तहसील कार्यालयात पार पडली. छाननीत सरपंचपदाचे सर्व अर्ज वैध ठरले तर सदस्यांसाठीचे चार ग्रामपंचायतींमधून 8 अर्ज अवैध ठरले.

नेवासा तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींमधील 16 सरपंच व 158 सदस्य तसेच दोन सदस्यांच्या पोटनिवडणुका अशा 160 सदस्यांसाठी अर्जांची छाननी पार पडली. सरपंचपदासाठी एकूण 100 अर्ज दाखल झालेले होते. ते सर्व वैध ठरले. सदस्यांसाठी दाखल 578 (पोटनिवडणुकांसह) अर्जांपैकी 8 अर्ज अवैध ठरल्याने एकूण 570 सदस्यांसाठीचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.

अवैध अर्ज ठरलेल्यांमध्ये नागापूर ग्रामपंचायतीचे सर्वाधिक 4 उमेदवारी अर्ज आहेत. देडगाव ग्रामपंचायतीचे 2 तर शहापूर व कौठा ग्रामपंचायतीच्या सदस्यांसाठीचे प्रत्येकी एक अर्ज अवैध ठरलेले आहेत. माळीचिंचोरेतील एका पोटनिवडणुकीसाठी 3 अर्ज दाखल होते ते तीनही अर्ज वैध ठरलेले आहेत.

गोधेगावची एका सदस्याची जागा यावेळीही रिक्तच

तालुक्यातील गोधेगाव ग्रामपंचायतीच्या गेल्या वर्षीच्या निवडणुकीत एक जागा एकही अर्ज न आल्याने रिक्त राहिली होती. त्यामुळे आता पोटनिवडणूक जाहीर झाली होती. यावेळी देखील या जागेसाठी एकही अर्ज न आल्याने ही जागा रिक्त राहिली आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी असलेली ही जागा आहे. या गावात या प्रवर्गाची लोकसंख्याही आहे. मात्र गावात अनुसूचित जातीच्या दाखल्याची व्हॅलिडीटी इच्छुकांकडे नसल्याने अर्ज दाखल झाला नाही. नाशिकला जावून व्हॅलिडीटी आणण्याचा त्रासामुळे कुणीही निवडणूक लढवण्याच्या भानगडीत पडत नाही.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com