नेवासा तालुक्यात चार गावांतून आढळले 5 करोना संक्रमित

नेवासा तालुक्यात चार गावांतून आढळले 5 करोना संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात काल 4 गावांतून 5 करोना संक्रमित आढळून आले. नेवासा शहरात (नेवासा खुर्द) काल दोघे बाधित आढळून आले. सलाबतपूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत मुकिंदपूर (नेवासाफाटा) येथे एक, शिरसगाव केंद्राअंतर्गत गेवराई येथे एक तर चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत घोडेगाव येथे एकजण करोना बाधित आढळून आला. अशाप्रकारे चार गावातून पाच करोना बाधित आढळून आले असून तालुक्यातील एकूण करोना संक्रमितांची संख्या 16 हजार 708 इतकी झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com