देडगावात 7 तर चांद्यात 6 बाधित; नेवासा तालुक्यात 27 गावांत 52 संक्रमित

देडगावात 7 तर चांद्यात 6 बाधित; नेवासा तालुक्यात 27 गावांत 52 संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात (Newasa Taluka) काल 27 गावांतून 52 करोना संक्रमित (Covid 19 Positive) आढळून आले. देडगाव येथे 7, चांद्यात 6 तर घोडेगाव (Ghodegav) येथे चौघे बाधित आढळले. चांदा प्राथमिक आरोग्य केंद्रा (Chanda Primary Health Center) अंतर्गत काल तालुक्यात सर्वाधिक 17 बाधित आढळले असून त्यात 6 बाधित चांद्यात आढळले. घोडेगावात चौघे, कौठ्यात तिघे, पाचुंद्यात दोघे तर माका व महालक्ष्मीहिवरे येथे प्रत्येकी एक संक्रमित आढळून आला.

कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्रा (Kukana Primary Health Center) अंतर्गत 12 संक्रमित आढळले. सर्वाधिक 7 बाधित देडगावात आढळले. सौंदाळा, जेऊरहैबती, चिलेखनवाडी, अंतरवाली व तेलकुडगाव येथे प्रत्येकी एकजण बाधित आढळून आला. नेवासा बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सुरेगाव व पाचेगाव येथे प्रत्येकी तिघे बाधित आढळले. बेलपिंपळगाव व उस्थळखालसा येथे प्रत्येकी एकजण संक्रमित आढळला. नेवासा खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत नेवासा शहरात तिघे तर खुपटी व अमळनेर येथे प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला.

सोनई केंद्राअंतर्गत (Sonai Center) सोनई, करजगाव, लोहगाव व झापवाडी येथे प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला. सलाबतपूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत म्हसले येथे तिघे तर पिचडगाव येथे एकजण बाधित आढळून आला.शिरसगाव केंद्राअंतर्गत गेवराई येथे एकजण बाधित आढळला. उस्थळदुमाला प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत वडाळा बहिरोबा येथे एकजण संक्रमित आढळून आला. अशाप्रकारे तालुक्यातील 27 गावांतून 52 बाधित आढळून आले असून तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 15 हजार 537 इतकी झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com