नेवासा तालुक्यात 22 गावांत 30 बाधित

नेवासा तालुक्यात 22 गावांत 30 बाधित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात (Newasa Taluka) काल 22 गावांतून 30 करोनाबाधित (Covid 19 Positive Patient) आढळून आले. सर्वाधिक 9 बाधित चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (Chanda Primary Health Center) कक्षेत आढळून आले. लोहारवाडी (Loharwadi), घोडेगाव (Ghodegav) व मांडेगव्हाण (Mandegvhan) येथे प्रत्येकी दोघे बाधित आढळले तर शिंगवेतुकाई (ShigaveTukai), पाचुंदा (Pachunda) व माका (Maka) येथे प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला.

नेवासा खुर्द आरोग्य केंद्राअंतर्गत सहाजण बाधित आढळले. त्यात नेवासा शहर (Newasa City) येथे तिघे तर तामवसवाडी, खुपटी व अमळनेर येथे प्रत्येकी एकजण बाधित आढळला.

कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सहा बाधित आढळले. त्यात देडगाव येथे तिघे, कुकाण्यात दोघे तर भेंडा खुर्द येथे एकजण संक्रमित आढळून आला.

सोनई केंद्राअंतर्गत तिघे बाधित आढळले. त्यात सोनई, गणेशवाडी व शिंगणापूर येथे प्रत्येकी एकजण बाधित आढळला.

नेवासा बुद्रुक केंद्रांतर्गत बेलपिंपळगाव भालगाव येथे प्रत्येकी एकजण बाधित आढळला. शिरसगाव केंद्राअंतर्गत पाथरवाला व वाकडी येथे प्रत्येकी एकजण संक्रमित आढळला. टोका केंद्रांतर्गत प्रवरासंगम येथे एकजण बाधित आढळून आला. सलाबतपूर केंद्राअंतर्गत एकही बाधित आढळून आला नाही. तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 15 हजार 260 इतकी झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com