नेवासा तालुक्यात 21 गावांत 53 बाधित

नेवासा तालुक्यात 21 गावांत 53 बाधित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात (Newasa Taluka) काल 21 गावांतूून 53 करोना संक्रमित (Covid 19 Positive Patient) आढळून आले. तालुक्यातील सोनई (Sonai) येथे सर्वाधिक 13 संक्रमित आढळले. चांदा (Chanda) येथे 6 जण तर नेवासा शहरात (Newasa City) 5 जण तर बेलपिंपळगाव (BelPimpalgav) येथे 4 जण बाधित आाढळून आले. तेलकुडगाव (Telkudgav) व देडगाव (Dedgav) येथे प्रत्येकी तिघे बाधित आढळून आले. भालगाव (Bhalgav), गेवराई (Gevrai), भेंडा खुर्द (Bhenda Khurd) व घोडेगाव (Ghodegav) या चार गावांतून प्रत्येकी दोघे करोना संक्रमित (Covid 19 Positive Patient) आढळले.

शिंगवेतुकाई, जेऊरहैबती, शिरसगाव, जैनपूर, घोगरगाव, सुरेगाव, वंजारवाडी, लोहगाव, शिंगणापूर, जळके खुर्द व इमामपूर या 11 गावातून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला. अशाप्रकारे तालुक्यातील 9 पैकी 7 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कक्षेत 21 गावांतून 53 बाधित आढळून आले. उस्थळदुमाला व सलाबतपूर या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कक्षेत एकही बाधित आढळला नाही. सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत 16 बाधित आढळले. नेवासा बुद्रुक, कुकाणा व चांदा या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कक्षेत प्रत्येकी 9 बाधित आढळले.नेवासा खुर्द केंद्राअंतर्गत 6, शिरसगाव केंद्राअंतर्गत तिघे तर टोका केंद्राअंतर्गत एकजण बाधित आढळला. तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 14 हजार 984 झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com