नेवासा तालुक्यात 18 गावांतून 20 बाधित

नेवासा तालुक्यात 18 गावांतून 20 बाधित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात काल रविवारी 18 गावांमधून 20 करोना संक्रमित आढळून आले. नेवासा खुर्द येथे एक बाधित आढळला. सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत पानसवाडी येथे तिघे तर बेल्हेकरवाडी, गणेशवाडी, झापवाडी, लांडेवाडी व सोनई येथे प्रत्येकी एकजण बाधित आढळून आला. नेवासा बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत नेवासा बुद्रुक, बेलपिंपळगावल घोगरगाव व उस्थळखालसा येथे प्रत्येकी एक बाधित आढळला.

शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत खामगाव व पिंपरीशहाली येथे प्रत्येकी एकजण संक्रमित आढळला. कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत भेंडा बुद्रुक व तेलकुडगाव येथे प्रत्येकी एक संक्रमित आढळला. चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत शिंगवेतुकाई, कांगोणी व माका येथे प्रत्येकी एकजण बाधित आढळून आला. अशाप्रकारे तालुक्यातील 18 गावांतून 20 बाधित आढळून आले असून तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 17 हजार 350 इतकी झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com