नेवासा तालुक्यात 11 संक्रमित

एकट्या बर्‍हाणपुरात 6 बाधित
नेवासा तालुक्यात 11 संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात करोना संक्रमितांची संख्या घटली असली तरी अधूनमधून संख्या वाढल्याचे दिसत आहे. काल रविवारी तालुक्यातील 6 गावांतून 11 करोना बाधित आढळून आले. सर्वाधिक 6 बाधित बर्‍हाणपूर येथे आढळले.

तालुक्यातील चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या बर्‍हाणपूर येथे काल 6 करोनाबाधित आढळून आले. सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत लांडेवाडी व शिरेगाव येथे प्रत्येकी एक बाधित आढळून आला. कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत तरवडी व देवगाव येथे प्रत्येकी एक संक्रमित आढळून आले. नेवासा बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत पानेगाव येथे एक संक्रमित आढळून आला. अशाप्रकारे तालुक्यातील 6 गावांतून 11 संक्रमित आढळून आले असून तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 16 हजार 642 इतकी झाली आहे.

नेवासा तालुक्यात शनिवारी व शुक्रवारी प्रत्येकी चार बाधित आढळून आले होते तर 15 नोव्हेंबरला 11 संक्रमित आढळले होते. त्यानंतर काल रविवारीही 11 संक्रमित आढळले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com