नेवासा तालुक्यात आढळले 5 करोना संक्रमित

नेवासा तालुक्यात आढळले 5 करोना संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात (Newasa Taluka) काल शनिवारी 5 करोना संक्रमित (Covid 19 Positive) आढळून आले असून तालुक्यातील एकूण करोना संक्रमितांची संख्या 16 हजार 351 झाली आहे. काल तालुक्यातील कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत (Kukana Primary Health Center) अंतरवाली, शहापूर व तेलकुडगाव या तीन गावात प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला.

उस्थळदुमाला केंद्राअंतर्गत रांजणगाव येथील एक तर नेवासा खुर्द केंद्राअंतर्गत अमळनेर येथील एकजण असे तालुक्यातून एकूण पाच बाधित आढळून आले. शुक्रवारी तालुक्यात केवळ एक बाधित (Positive) आढळला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com