नेवासा तालुक्यात 29 गावांतून 46 संक्रमित

नेवासा तालुक्यात 29 गावांतून 46 संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात (Newasa Taluka) काल गुरुवारी 29 गावांतून 46 करोना संक्रमित (Covid 19 Positive) आढळून आले आहेत. चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत (Chanda Primary Health Center) सर्वाधिक 12 संक्रमित आढळून आले. कौठा (Kauthe) येथे तिघे, लोहारवाडी व कांगोणी येथे प्रत्येकी दोघे तर बर्‍हाणपूर, घोडेगाव, चांदा, शिंगवेतुकाई व पाचुंदा या 5 गावातून प्रत्येकी एकजण बाधित आढळून आला.

उस्थळदुमाला प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत 6 गावातून 11 बाधित आढळले. वडाळा बहिरोबा व उस्थळदुमाला येथे प्रत्येकी तिघे तर खरवंडी येथे दोघे संक्रमित आढळले. निपानीनिमगाव, नारायणवाडी व म्हाळसपिंपळगाव या तीन गावात प्रत्येकी एकजण बाधित आढळून आला.

कुकाणा प्राथमिकआरोग्य केंद्राअंतर्गत (Kukana Primary Health Center) 6 गावातून 10 संक्रमित आढळले. जेऊरहैबती येथे तिघे तर देवगाव व देवसडे येथे प्रत्येकी दोघे संक्रमित आढळले. सौंदाळा, कुकाणा व तरवडी या तीन गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळला.

नेवासा बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत (Newasa Budruk Primary Health Center) चार गावांतून 7 जण बाधित आढळले. सुरेगाव येथे चौघे तर नेवासा बुद्रुक, बेलपांढरी व जायगुडे आखाडा या तीन गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळला. सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत तीन गावांतून चौघे बाधित आढळले. सोनईत दोघे तर झापवाडी व पानेगाव येथे प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला. सलाबतपूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत पिचडगाव येथील एकजण संक्रमित आढऴून आला. शिरसगाव केंद्राअंतर्गत शिरसगाव येथील एकजण बाधित आढळून आला. टोका व नेवासा खुर्द या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कक्षेत काल गुरुवारी एकही संक्रमित आढळून आला नाही. तालुक्यातील एकूण करोना संक्रमितांची संख्या आता 15 हजार 901 इतकी झाली आहे.

Related Stories

No stories found.