नेवासा शहरात 7 तर अंतरवालीत 5 बाधित

नेवासा शहरात 7 तर अंतरवालीत 5 बाधित

20 गावांतून आढळले 36 संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात (Newasa Taluka) काल 20 गावांतून 36 करोनाबाधित (Covid 19 Positive Patient) आढळून आले. सर्वाधिक 7 बाधित नेवासा शहरात (Newasa City) आढळले तर अंतरवाली (antarwali) येथे 5 संक्रमित आढळून आले.

नेवासा खुर्द (Newasa Khurd) प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत नेवासा शहरातून 7, तामसवाडी येथे दोघे तर गोमळवाडी येथे एक असे एकूण 10 बाधित आढळले.

कुकाणा केंद्रांतर्गत अंतरवाली येथे पाच, जेऊरहैबती येथील दोघे तर भेंडा बुद्रुक व तरवडी येथून प्रत्येकी एकजण बाधित आढळून आले. चांदा केंद्राअंतर्गत माका येथे दोघे तर चांदा व घोडेगाव येथे प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला.

सोनई केंद्रांतर्गत (Sonai Center) शिंगणापूर येथील दोघे तर पासवाडी येथील एकजण बाधित आढळला. नेवासा बुद्रुक केंद्रांतर्गत गोधेगाव येथील दोघे तर भालगाव येथील एकजण बाधित आढळला. शिरसगाव केंद्राअंतर्गत पिंप्रीशहाली, नजिकचिंचोली व शिरसगाव या तीन गावांतून प्रत्येकी एकजण बाधित आढळून आला.

उस्थळदुमाला केंद्रांतर्गत खरवंडी व माळीचिंचोरा येथील प्रत्येकी एकजण बाधित आढळले. सलाबतपूर केंद्रांतर्गत गोंडेगाव येथील एकजण संक्रमित आढळून आला. टोका प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत एकही बाधित आढळून आला नाही. अशाप्रकारे 20 गावांतून काल 36 करोनाबाधित (Covid 19 Positive Patient) आढळून आले असून त्यामुळे तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 13 हजार 970 वर गेली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com