नेवासा तालुक्यात 9 गावांतून 12 संक्रमित

एकट्या देवसडे गावात चौघे बाधित
नेवासा तालुक्यात 9 गावांतून 12 संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात (Newasa Taluka) काल रविवारी 9 गावांतून 12 करोना संक्रमित (Covid 19 Patient) आढळून आले असून एकट्या देवसडे गावात (Desvade Village) काल चौघे बाधित (Positive Patient) आढळले.

कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत (Kukana Primary Health Center) सर्वाधिक 6 बाधित आढळून आले. त्यात देवसडे (Desvade) येथे चौघे तर देडगाव व देवगाव येथील प्रत्येकी एका बाधिताचा (Positive) समावेश आहे. चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत शिंगवेतुकाई, बर्‍हाणपूर व घोडेगाव या तीन गावांतून प्रत्येकी एकजण बाधित आढळला. सलाबतपूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत मुकिंदपूर येथे एक तर सोनई केंद्राअंतर्गत मोरेचिंचोरे येथे एकजण संक्रमित आढळून आला. अशाप्रकारे 9 गावांतून 12 संक्रमित आढळले असून तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 16 हजार 421 झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com