नेवाशात 14 गावातून 21 संक्रमित; चांद्यात 5 बाधित

नेवाशात 14 गावातून 21 संक्रमित; चांद्यात 5 बाधित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील 14 गावातून 21 करोना संक्रमित आढळून आले. एकट्या चांद्यात पाच बाधित आढळून आले.

देवगाव येथे तिघे बाधित आढळले. कुकाणा येथे दोघे बाधित आढळले. नेवासा शहर, सोनई, लोहगाव, शिरेगाव, खेडलेपरमानंद, शिरसगाव, वाकडी, भेंडा खुर्द, उस्थळदुमाला, रस्तापूर व महालक्ष्मीहिवरे या 11 गावातून प्रत्येकी एक बाधित आढळला. टोका, नेवासा बुद्रुक व सलाबतपूर या तीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेतील एकाही गावात काल संक्रमित आढळून आला नाही. तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 15 हजार 818 झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com