नेवासा तालुक्यात 26 गावात 56 बाधित

नेवासा तालुक्यात 26 गावात 56 बाधित

चांद्यात आढळले 12 संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा (Newasa) तालुक्यात काल शनिवारी 26 गावांतून 56 करोनाबाधित (Covid 19 Positive Patient) आढळून आले असून सर्वाधिक 12 बाधित चांद्यात (Chanda) आढळले.

चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (Chanda Primary Health Center) कक्षेत तालुक्यात सर्वाधिक 23 बाधित आढळले. त्यात चांदा (Chanda) येथे 12, कौठा येथे तिघे, माका (Maka) व घोडेगाव (Ghodegav) येथे प्रत्येकी दोघे बाधित आढळले. महालक्ष्मीहिवरे, बर्‍हाणपूर, पाचुंदा व रस्तापूर येथे प्रत्येकी एकजण बाधित आढळून आला.

कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (Kukana Primary Health Center) अंतर्गत 9 बाधित आढळले. त्यात सुकळी येथे चौघे, देडगावात (Dedgav) तिघे तर शहापूर व तरवडी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

सोनई केंद्राअंतर्गत 8 संक्रमित आढळले. सोनईत तिघे बाधित आढळले. गणेशवाडी, पानेगाव, वांजोळी, झापवाडी व शिरेगाव येथे प्रत्येकी एकजण बाधित आढळून आला.

नेवासा खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रातील नेवासा शहरात चौघे तर तामसवाडी येथील दोघे बाधित आढळले.

नेवासा (Newasa) बुद्रुक केंद्राअंतर्गत सुरेगाव येथे चौघे संक्रमित आढळून आले. सलाबतपूर केंद्राअंतर्गत मुकिंदपूर येथे एक तर शिरसगाव केंद्राअंतर्गत गेवराई येथे एकजण संक्रमित आढळून आला.

उस्थळदुमाला केंद्राअंतर्गत उस्थळदुमाला येथे दोघे तर खरवंडी व कारेगाव येथे प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला. टोका केंद्राअंतर्गत एकही बाधित आढळून आला नाही.

अशाप्रकारे तालुक्यातील 26 गावांतून 56 संक्रमित आढळून आल्याने तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 15 हजार 463 इतकी झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com