नेवासा बनला कापूस उत्पादक तालुका

नेवासा बनला कापूस उत्पादक तालुका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नेवासा तालुका उसासाठी ओळखला जातो. त्याच तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता

तो राज्यातील कापूस उत्पादक तालुक्यांच्या यादीत गेला आहे. याबाबतचे परिपत्रक पणन व वस्त्रोद्योग विभागाने जारी केले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात मागील दोन वर्षांतील सरासरी कापसाचे उत्पादन 9600 टनापेक्षा जास्त असल्याने या तालुक्याचा समावेश कापूस उत्पादक तालुक्यांच्या यादीत करण्यात येत आहे. त्यामुळे आता राज्यातील कापूस उत्पादक तालुक्यांची संख्या 122 होत आहे.

नेवासा तालुक्याला मुळा-प्रवरा-गोदावरी नदीचा स्पर्श झाल्याने येथे मोठ्या प्रमाणात ऊस मळे फुलले. त्यामुळे या तालुक्यातील लोकनेते मारूतराव घुले पाटील (ज्ञानेश्वर) आणि मुळा सहकारी साखर कारखाने उभे राहिले.

त्यातून या भागाला बहर आला. पण आता काही शेतकरी ऊसाऐवजी कापसाच्या पिकाकडे वळले आहेत. शेजारचा शेवगाव तालुका कापसाचे आगार समजले जाते. नगदी आणि कमी पाण्यात येणारे पीक म्हणून तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी कापसाच्या उत्पादनाकडे वळला आहे. आतातर हा तालुका कापूस उत्पादकांच्या यादीत गेला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com