सोनईत 20 तर वडाळ्यात 12 बाधित

नेवासा शहरात 11 बाधित; तालुक्यात 43 गावांतून 118 संक्रमित
सोनईत 20 तर वडाळ्यात 12 बाधित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील 43 गावांतून काल 118 संक्रमित आढळून आले. सर्वाधिक 20 संक्रमित सोनईत आढळले असून त्या खालोखाल वडाळाबहिरोबा येथे 12 संक्रमित आढळून आले.

काल नेवासा शहरात 11 बाधित आढळले. तालुक्यातील एकूण 43 गावांतून 118 संक्रमित आढळले. तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 5 हजार 670 झाली आहे.

चांदा येथे काल 8 बाधित आढळले. घोडेगाव व राजेगाव येथे प्रत्येकी 5 संक्रमित आढळून आले.

शिंगणापूर व तामसवाडी या दोन गावातून प्रत्येकी चौघे बाधित आढळले. मुकिंदपूर, सलाबतपूर व भानसहिवरा येथे प्रत्येकी तिघे बाधित आढळले.कुकाणा, बर्‍हाणपूर, हंडीनिमगाव, धनगरवाडी, गोगलगाव, हिंगोणी, कांगोणी व खामगाव या 8 गावांतून प्रत्येकी दोघे बाधित आढळले. वरखेड, वाकडी, म्हाळसपिंपळगाव, शिरसगाव,सौंदाळा, माळीचिंचोरा, लोहारवाडी, प्रवरासंगम, लांडेवाडी, खुपटी, पाचेगाव, शिरेगाव, खरवंडी, गोंडेगाव, गोमळवाडी, गोधेगाव, घोगरगाव, गेवराई, गळनिंब,गणेशवाडी, धामोरी, भालगाव, बाभुळखेडा व अमळनेर या 24 गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com