नेवासा तालुक्यातील शाळांमध्ये साडेतेहतीस टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

नेवासा तालुक्यातील शाळांमध्ये साडेतेहतीस टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

47 हजार 606 पैकी 15 हजार 937 विद्यार्थी उपस्थित

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा तालुक्यात काल शाळेच्या पहिल्या दिवशी 162 पैकी 147 शाळा सुरू झाल्या असून 47 हजार 606 पैकी 15 हजार 937 विद्यार्थ्यांनी (33.47 टक्के) शाळेत उपस्थिती दर्शवली असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी यांनी दिली.

नेवासा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या एकूण 70 तर पाचवी ते 12 वीच्या अनुदानीत 57 शाळा तर विनाअनुदानीत 35 अशा एकूण 162 शाळा आहेत. त्यापैकी जिल्हा परिषदेच्या पाचवी ते सातवीच्या 70 पैकी 64, पाचवी ते बारावीच्या उनदानीत 55 तर विनाअनुदानीत 28 अशा 147 शाळांची घंटा काल पहिल्या दिवशी वाजली. तालुक्यातील 15 शाळा काल पहिल्या दिवशी सुरू झाल्या नाहीत.

जिल्हा परिषदेच्या पाचवी ते सातवीच्या 3 हजार 912 विद्यार्थ्यांपैकी 2076 विद्यार्थी उपस्थित राहिले. खासगी अनुदानीतच्या पाचवी ते बारावी पर्यंतच्या 38 हजार 19 विद्यार्थ्यांपैकी 12 हजार 299 विद्यार्थी उपस्थित राहिले. तर खासगी विनाअनुदानीतच्या 5675 विद्यार्थ्यांपैकी 1567 विद्यार्थी काल उपस्थित राहिले. अशाप्रकारे 47 हजार 606 विद्यार्थ्यांपैकी तालुक्यातील 15 हजार 937 विद्यार्थी उपस्थित राहिले.

विद्यार्थ्यांना उपस्थितीसाठी पालकांची संमतीपत्रे आवश्यक केलेली असून काल पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेच्या 2019 विद्यार्थ्यांनी पाचवी ते बारावीच्या अनुदानीत शाळांच्या 6 हजार 159 विद्यार्थ्यांनी तर विनाअनुदानीत शाळांच्या 1139 विद्यार्थ्यांनी अशा एकूण 9 हजार 317 विद्यार्थ्यांनी शाळेकडे संमतीपत्रे सुपूर्द केली.

गांधी कन्या विद्यालयातील 479 पैकी 201 विद्यार्थिनींची उपस्थिती

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

करोनाच्या पहिल्या लाटेपासून बंद असणार्‍या शाळांचे दरवाजे सोमवारी उघडले. कोविडचा प्रभाव कमी झाल्याने शालेय शिक्षण विभागाने शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग भरविण्यास मुभा दिली आहे. त्यानुसार शहरातील कै. सौ. सुंदरबाई गांधी कन्या विद्यालयातील 8 वी ते 12 वी पर्यंतच्या 479 विद्यार्थिनींपैकी 201 विद्यार्थिनींनी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यालयात हजेरी लावली.

विद्यालयात 8 वी च्या 140, पैकी 51, 9 वी च्या 126 पैकी 65, 10 वी च्या 129 पैकी 58, 11 वी च्या 38 पैकी 10, 12 वी च्या 46 पैकी 17 विद्यार्थिनीनी हजेरी लावली.

मुख्याध्यापीका कमल घोडके, पर्यवेक्षक रावसाहेब चौधरी, शिक्षक यशवंत खोसे, ज्ञानेश्वर दरंदले, सुजाता गोरे, सुनीता भिंगारदिवे, शोभा नागपुरे, रामभाऊ कोरडे आदींनी विद्यार्थिनींचे स्वागत करून पुस्तके वाटप केले.

मुख्याध्यापीका घोडके म्हणाल्या की शासनाच्या आदेशानुसार शाळा सुरू करण्यासाठी वर्ग निर्जंतूक करण्यात आले आहेत. तसेच वर्गात सामाजिक अंतराचे पालन करण्यात येवून शाळा सुरू करण्यात आली आहे.

पर्यवेक्षक रावसाहेब चौधरी म्हणाले, विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून उपस्थिती वाढविण्यासाठी पालकांशी संपर्क करण्याचे काम सुरू आहे.

Related Stories

No stories found.