
नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa
तालुक्यातील खुपटी व चिंचबन शिवारातील नदी पात्रांतून वाळू उपसा करून घेऊन जाणारे 2 डंपर नेवासा तहसीलदारांच्या पथकाने ताब्यात घेवून त्यांच्यावर कारवाई केली.
याबाबत माहिती अशी की, तहसीलदार संजय बिरादार यांनी शनिवारी सकाळी 11 वाजता वाळूची अवैध वाहतूक करत असताना चिंचबन ते खुपटी असा 4 किलोमीटर पाठलाग करुन दोन डंपर ताब्यात घेवून नेवासा तहसिल कार्यालयाच्या आवारात पुढील दंडात्मक कारवाईसाठी लावण्यात आले.
जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये एमएच 12 एई 1013 क्रमांकाचा डंपर (मालक सोमनाथ आसाराम हिवरे) तर दुसर्या डंपरचा (एम़एच 12 बीएफ 1712) मालक अमोल सुखदेव चापे, चालक सुनिल हिरामन माळी यांचा समावेश आहे.
सदरची कारवाई ही तहसिलदार संजय बिरादार, नायब तहसिलदार किशोर सानप, नेवाशाचे मंडलाधिकारी ए. डी. गव्हाणे वडाळा बहिरोबाचे मंडलाधिकारी बी. ई. मंडलिक, तलाठी सोपान गायकवाड, तलाठी श्री. आघाव, तलाठी संभाजी थोरात, कोतवाल बाळू चौधरी यांनी केली. या कारवाईचे नागरिकांमधून कौतुक केले जात आहे.