देवगडला उत्तराधिकारी दीक्षा सोहळा संपन्न; महंत प्रकाशानंदगिरी महाराज नवे उत्तराधिकारी

देवगडला उत्तराधिकारी दीक्षा सोहळा संपन्न; महंत प्रकाशानंदगिरी महाराज नवे उत्तराधिकारी

देवगड फाटा | वार्ताहर

नेवासा तालुक्यातील श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांनी स्थापित केलेले व प्रवरा मातेच्या कुशीत असलेले भगवान श्रीदत्तप्रभूंचे स्थान असलेल्या श्रीक्षेत्र देवगड संस्थान येथे महंत हभप भास्करगिरीजी महाराज....

यांनी आपल्या अध्यात्मिक कार्यासाठी कृष्णा महाराज मते यांची देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी म्हणून निवड केली. कृष्णा महाराज मते यांना दीक्षा समारंभ आज दि.6 मे 2022 रोजी श्री दत्त मंदिर संस्थान श्री क्षेत्र देवगड येथे संपन्न झाला. कृष्णा महाराज मते यांचे महंत प्रकाशानंदगिरी महाराज असे नवे नामकरण करण्यात आले. कृष्णा महाराज मते यांना पंच गुरूंनी दीक्षा दिली.

या प्रसंगी जुना आखाडाचे वेदव्यास पुरी जी महाराज, महंत देवेंद्रजी गिरी महाराज, महंत भास्करगिरी महाराज, महंत शिवानंदजी गिरी, महंत नारायनगिरीजी महाराज, महंत विश्वभर गिरी महाराज, भास्करगिरी महाराज यांच्या मातोश्री सरुबाई पाटील, मा खासदार चंद्रकांत खैरे, खासदार सदाशिव लोखंडे, विश्व हिंदू परिषदेचे अलोक जी, बबनराव पाचपुते, हरिभाऊ बागडे, शिवाजी कर्डीले, नाना उजवणे, उदयन गडाख, मा आमदार अण्णासाहेब माने आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.