जेऊर हैबती येथील स्मशानभूीच्या जागेवरील 10 वर्षां पासूनचा वाद मिटविण्यात यश

पोलीस निरीक्षक विजय करे यांची शिष्टाई...
जेऊर हैबती येथील स्मशानभूीच्या जागेवरील 10 वर्षां पासूनचा वाद मिटविण्यात यश

नेवासा | तालुका प्रतिनिधी | Newasa

नेवासा पोलीस ठाण्याचे (Newasa Police Station) निरीक्षक विजय करे (Police Inspector Vijay Kare) यांच्या शिष्टाईमुळे तालुक्यातील जेऊर हैबती (Jaur Haibti) येथील स्मशानभूीच्या जागेवरून गेल्या दहा वर्षांपासून दोन समाजात तेढ निर्माण करण्यास कारणीभूत असलेला वाद मिटविण्यास शासकिय यंत्रणेला यश मिळाले आहे.

जेऊर हैबती येथील स्मशानभूीच्या जागेवरील 10 वर्षां पासूनचा वाद मिटविण्यात यश
खळळजनक! डोक्यात फावडे घालून पती-पत्नीचा खून

नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथील स्मशानभूीच्या जागेवरील 10 वर्षां पासूनचा तो वाद मिटवण्यात शासकीय यंत्रणेला यश आल्याने पुढील अनर्थ टळला. दूभंगत चाललेली मने एकत्र आणत धुमसत असलेला तो वणवा पेटण्या आधीच विझला. एकमेकांवर दंड थोपटून उगारलेले हात मैत्रीसाठी पुन्हा सरसावले. जेऊरहैबती येथील स्मशानभूीच्या जागेवरील वाद व त्यातून दोन्ही समाजात निर्माण झालेला तणाव सरकारी यंत्रणेच्या पुढाकारातून सामंजस्याच्या भूमिकेने केवळ निवळलाच नाहीतर वादाचे मुळ ठरलेल्या जागेवर पोलिसांनी आखुन दिलेली लक्ष्मण रेषाही मान्य झाल्याने जागेच्या वादावरही पडदा पडला आहे.

जेऊरहैबती येथे गेल्या दहा वर्षांपासून सरकारी जागेवरील स्मशानभूमी व कब्रस्थानचा वाद अनेकदा ग्रामस्थ, सरकारी यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी, राजकीय कार्यकर्ते यांनी बैठका घेऊन थांबवण्याचा प्रयत्न केला पण थांबण्याऐवजी हा वाद तेवतच राहिला. पुढे पोलिस ठाण्यात केसेस, न्यायालयात वाद गेले. दोन समाजातील या वादाने या गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न केंव्हा निर्माण होईल याचा नेम नसे. गेल्या महिन्यात याच जागेवरून दोन समाजात तेढ निर्माण झाल्याने नेवाशाचे पोलिस निरीक्षक विजय करे यांचेकडे दोन्ही बाजूंच्या तक्रारी गेल्या. निरीक्षक करे यांनी त्याच वेळी या गावात बैठक घेतली. पण पहिल्या बैठकीत त्यांना अपयश आले. त्यानंतर गेल्या आठवडयात हा वाद पुन्हा उफाळून आल्याने हा वाद मिटवण्याचा चंगच करे यांनी बांधला.

गुरूवार दि.24 जून रोजी निरीक्षक करे यांनी तहसिलदार रूपेशकुमार सुराणा (Tehsildar Rupeshkumar Surana), गटविकास अधिकारी शेखर शेलार (Shekhar Shelar) यांना सोबत घेत प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. नेमकी परिस्थिती काय हे जाणुन घेत जागेवरच दोन्ही समाजांचे समुपदेशन केले. एकीकडे सामंजस्य तर दूसरीकडे कायद्याचा धाकही बोलून दाखवला. काही तरूण ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हते. त्यांना भांडण, मारामारीने होत असलेल्या नुकसानीची कल्पना दिली. दुपारी 3 वाजता आलेली सरकारी यंत्रणा येथील वाद मिटवण्यासाठी तब्बल रात्रीचे साडेसात वाजेपर्यंत येथेच तळ ठोकून होती. त्याचवेळी दोन्ही समाजाला मान्य होईल असा ताेडगा निरीक्षक करे यांनी काढला. तो दोन्हीकडूनही बराच खल झाल्यानंतर मान्य होताच त्या जागेवर वरील तिनही अधिकरयांच्या उपस्थितीत लक्ष्मण रेषा आखुन दिली. एकमेकांनी या रेषेचे पालन करावे असा सल्ला अन दमही भरण्यात आला. गेले अनेकवर्षे धुमसत असलेला हा वाद सरकारी यंत्रणेने मनावर घेतल्याने जागेचा वाद जागेवरच शमल्याने गावकयांनही सुटकेचा निश्वास टाकला. केवळ दंडूका वापरूनच नव्हे तर सामोपचारानेही वाद मिटवता येतो हे सरकारी यंत्रणेने दाखवुन दिले. हा वाद शमल्याने पुढील अनर्थ मात्र टळला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com