
चांदा | वार्ताहर
नेवासा तालुक्यातील चांदा येथे सोनई पोलिसांनी छापा टाकुन कत्तलीच्या उद्देशाने डांबुन ठेवलेल्या पाच गोवंशीय जणावरांची सुटका करत संबधीतावर गुन्हा दाखल केला आहे .
याबाबत सोनई पोलास स्टेशनचे सपोनि माणिक चौधरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राजेंद्र थोरात व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोहल्यात छापा टाकला. त्यावेळी त्या ठिकाणी अन्नपाण्याविना आखूड दोराने निर्दयीपणे कत्तलीच्या उद्देशाने पाच गोवंशीय जातीय जनावरे आढळून आली.
त्यामध्ये तीन गोऱ्हे, एक कालवड, एक गाय अशी अंदाजे एक लाख सहा हजार रुपये किमतीची गोवंशीय जनावरे ताब्यात घेऊन त्यांनी गोशाळेत नेऊन सोडण्यात आले. अशी माहिती सोनई पोलिसांनी दिली. या संदर्भात शब्बीर हसन पठाण (रा. चांदा) याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे.