नेवासा : 60 गावांतून आढळले 171 संक्रमित

सोनईत सर्वाधिक 24, पुनतगावात 10 तर नेवासा शहरात 8 संक्रमित
नेवासा : 60 गावांतून आढळले 171 संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील सोनईत कालही सर्वाधिक रुग्ण आढळून आले. सोमवारी सोनईत 24 संक्रमित आढळले. त्याखालोखाल पुनतगाव येथे 10 तर नेवासा शहरात 8 संक्रमित आढळले.

निंभारी येथे 6, सुलतानपूर येथे 5 संक्रमित आढळले. भालगाव, भेंडा खुर्द, गिडेगाव, मुकिंदपूर, घोडेगाव, गोधेगाव, नजिकचिंचोली, शिरसगाव, कांगोणी, खामगाव व तरवडी या 11 गावांतून प्रत्येकी चौघे बाधित आढळले. रांजणगाव, माळीचिंचोरा, करजगाव, गेवराई, चांदा व तेलकुडगाव या 6 गावांतून प्रत्येकी तिघे बाधित आढळले.

बकुपिंपळगाव, गोगलगाव, गळनिंब, मोरेचिंचोरे, कुकाणा, जळके बुद्रुक, हनुमानवाडी, जैनपूर, वडाळा, माका, खरवंडी, खेडलेपरमानंद, शहापूर, मुरमे, पिचडगाव, वाटापूर व वाकडी या 17 गावातून प्रत्येकी दोघे संक्रमित आढळले. शिंगवेतुकाई, वाघवाडी, उस्थळखालसा, सौंदाळा, रामडोह, म्हाळसपिंपळगाव, शिंगणापूर, लोहगाव, लांडेवाडी, पानसवाडी, गोपाळपूर, जेऊरहैबती, खेडलेकाजळी, पाचुंदा, घोगरगाव, धनगरवाडी, चिलेखनवाडी, अंमळनेर व भेंडा बुद्रुक या 19 गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला. अशाप्रकारे 60 गावांतून 171 संक्रमित आढळून आले. तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 9 हजार 665 इतकी झाली आहे.

तीन गावात 42 संक्रमित

सोनई, पुनतगाव व नेवासा शहरात मिळून काल एकूण 42 संक्रमित आढळले. एका गावात 6, एका गावात पाच, 11 गावात प्रत्येकी चार, 6 गावांतून प्रत्येकी तिघे, 17 गावांतून प्रत्येकी दोन तर 19 गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com