कष्टाने घेतलेला मोबाईल गेला खड्डयात...

अपघातास कारणीभूत ठरणारे रस्त्यातील खड्डे बुजविण्याची
कष्टाने घेतलेला मोबाईल गेला खड्डयात...

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

नेवासा-शेवगाव महामार्गावर (Newasa Shevgav Road) नेवासा फाटा ते कुकाणा (Newasa Phata to Kukana) दरम्यान रस्त्यावर मोठं मोठाली खड्डे (Pits) पडली असून ही अपघातास कारणीभूत ठरत आलेली खड्डे बुजवावीत अशी मागणी (Demand) होत आहे. भेंडा (Bhenda) येथे बसस्थानक चौकातील रस्त्याचे खड्ड्यात पावसाचे पाणी साचून निर्माण झालेल्या डबक्यातील पाण्यात एका दुचाकीस्वराचा नवा कोरा अँड्रॉइड मोबाईल (Android mobile) पडल्याने तो निकामी झाल्याची घटना घडली असून कष्टाने घेतला आणि खड्डयाने नेला अशी गत त्याची झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

नेवासा-शेवगाव रस्त्याची (Newasa-Shevgav Road) नेवासा फाटा ते कुकाणा (Newasa Phata to Kukana) दरम्यानची अवस्था रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ता अशी झलेली आहे. नागपूर फाटा ते सौंदाळा दरम्यान डांबरी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईड पट्ट्या सुमारे दीड-दीड फुटांपर्यंत खचलेल्या आहेत,मोठी आणि खोल खड्डे पडलेले आहेत.त्यामुळे आगोदरच अरुंद असलेल्या या रस्त्यावर दोन वहाने जातांना डांबरी रस्त्याचे खाली वहान उतरविणे धोक्याचे ठरत आहेत. दुचाकी व चार चाकी वहान चालवताना नेमका कोणता खड्डा हुकवावा हा प्रश्न पडतो. वेगाने गाडी खड्डयात गेल्याने अनेक अपघात होऊन दुखापती होत आहेत.त्यामुळे हा रस्ता आणि रस्त्यावरील खड्डे अपघाताला कारणीभुत ठरत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या साईड पट्ट्या व खड्डे बुजवावेत अशी मागणी होत आहे.

भेंडा येथे बसस्थानक चौकातील रस्त्याचे खड्ड्यात पावसाचे पाणी साचून निर्माण झालेल्या डबक्यातील पाण्यात पडलेला नवा कोरा अँड्रॉइड मोबाईल शोधतांना मोबाईल मालक व त्याचे मित्रांना मोठी कसरत करावी लागली.पाण्यात उतरून खड्यात चाफत चाफत,खड्ड्यातील पाणी उपसत मोबाईल शोधण्याचे अग्निदिव्य करावे लागले.नुकताच दुकानातून खरेदी करून आणलेला नवा कोरा मोबाईल पाण्यात पडल्याने या तरुणांनी सार्वजनिक खात्याच्या नावाने लाखोली वाहिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com