सराफाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यास पोलिसांना विरोध; पाच जणांवर गुन्हा दाखल

सराफाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यास पोलिसांना विरोध; पाच जणांवर गुन्हा दाखल

नेवासा (का. प्रतिनिधी)

पनवेल येथील चोरी प्रकरणी आरोपीने नेवासा तालुक्यातील सराफाकडे दागिने दिल्याची कबुली दिल्याने आरोपीला घेऊन पोलीस सलाबतपुर येथील सराफ दुकानात चौकशीसाठी गेले असता...

दुकान मालकाने सहकार्य न करता त्याने व त्याच्या नातेवाईकांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची घटना घडली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात पाच जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, पनवेल येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाळंदे हे आरोपी विनोद उर्फ खंग्या विजय चव्हाण याने दिलेल्या कबुलीमुळे त्याला घेऊन नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथे सराफ दुकानात चौकशीसाठी गेले होते.

दुकान मालक सुजित सुभाष कपिले याने पोलिसांना सहकार्य न करता औषध पिऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली त्याचे वडील, पत्नी, भावजई तसेच मावशी यांनी आडाओरड करून सरकारी कामात अडथळा आणला आम्ही सर्व विषारी औषध पिऊन आत्महत्या करतो असे बोलून सुजितला ताब्यात घेत असताना पोलिसांशी झटापट करून सरकारी कामात अडथळा आणला. या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 353 309 143 147 149 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com